Breaking

Post Top Ad

शनिवार, १५ ऑगस्ट, २०२०

नव्याने आढळले पाॅझिटिव्ह रूग्ण:26 जणांना सुट्टी

नव्याने आढळले पाॅझिटिव्ह रूग्ण:26 जणांना सुट्टी

यवतमाळ, दि. 15 : जिल्ह्यात शनिवारी नव्याने 60 नवीन पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडली असून दोन कोरोनाबाधित महिलांचा मृत्यु झाला. तसेच आयसोलेशन वॉर्ड आणि विविध कोव्हीड सेंटरमध्ये भरती असलेले 26 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत 33915 नमुने पाठविले आहे. यापैकी 33606 प्राप्त तर 309 अप्राप्त आहेत. तसेच 31468 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.
मृतांमध्ये यवतमाळ शहरातील वॉर्ड क्रमांक 1 येथील 50 वर्षीय महिला आणि दिग्रस शहरातील 58 वर्षीय महिला आहे. तर नव्याने पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये 35 पुरुष आणि 25 महिलांचा समावेश आहे. यात घाटंजी शहरातील तीन पुरुष व दोन महिला, वणी शहरातील ड्रीम लॅन्ड गणेशपूर येथील एक महिला, शहरातील एक महिला व शास्त्री नगर येथील एक पुरुष, वणी तालुक्यातील चिंचोली येथील दोन पुरुष, महागाव शहरातील दोन पुरुष व तीन महिला, महागाव तालुक्यातील मलकिन्ही येथील एक पुरुष, गुंज येथील दोन पुरुष व एक महिला, शिरपूर व बानोली येथील प्रत्येकी एक पुरुष, महागाव तालुक्यातील एक पुरुष, पांढरकवडा तालुक्यातील साईखेडा डॅम येथील एक महिला, यवतमाळ शहरातील गांधी नगर येथील एक पुरुष तसेच शहरातील सहा महिला व सहा पुरुष, बाभुळगाव शहरातील एक पुरुष, पुसद शहरातील जाम नगर येथील एक पुरुष तसेच शहरातील चार पुरुष व चार महिला, दिग्रस शहरातील चार पुरुष व दोन महिला, केळापूर तालुक्यातील घुबडी येथील एक पुरुष, दारव्हा शहरातील तीन पुरुष व चार महिला पॉझेटिव्ह आल्या आहेत.

जिल्ह्यात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु आणि 'पॉझिटीव्ह टू निगेटिव्ह' झालेल्या 26 जणांना सुट्टी झाल्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 665 आहे. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 2138 झाली आहे. यापैकी 1414 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 56 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 144 जण भरती आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad