Breaking

Post Top Ad

बुधवार, २६ ऑगस्ट, २०२०

यवतमाळ मध्ये कुख्यात गुंडाची भर रस्त्यावर हत्या

यवतमाळ मध्ये कुख्यात गुंडाची भर रस्त्यावर हत्या
अज्ञात आरोपी घटनास्थळा वरून पसार
यवतमाळ शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी प्रमाण कमी झाले असताना आज दि.२६ ऑगस्ट रोजी दिवसा ढवळ्या भर चौकात एकाचा खून केल्याची घटना दुपारी दिड वाजता दरम्यान दारव्हा रोड वरील मारोती शो रूम जवळ घडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
घटनेतील मृतकांचे नाव देवा निरंजन चव्हाण रा.उद्योग नगर लोहारा-यवतमाळ असे आहेत. घटनेतील मृतक हा दुचाकीने जात असताना चार चाकी वाहनात अज्ञात लोकांनी त्याला रस्त्याच्या बाजुला थांबवून सपासप वार करून जगाची ठार केले. विशेष म्हणजे मृतक हा एका प्राणघातक हल्यातील आरोपी आहे. दिड वर्षा पुर्वी मृतक ला या संदर्भात अटक सुध्दा झाली होती. वचक काढण्याचा दृष्टिकोनातून मृतक देवा निरंजन चव्हाण वर हा हल्ला झाल्याचे बोलल्या जात आहे. या घटनेने पुन्हा शहरातील भाईगिरी करणारे गुडं सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad