Breaking

Post Top Ad

शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२०

"राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा"; जिल्हाधिकारी एम.डी.सिंह

"राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा"; जिल्हाधिकारी एम.डी.सिंह
यवतमाळ, दि.१४ :   स्वातंत्र्य दिन हा राष्ट्रीय सण राज्यभर साजरा करण्यात येतो. यावेळी राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान व्हावा, हे प्रत्येक सुजाण नागरिकांचे कर्तव्य आहे. त्यामुळे १५ ऑगस्ट  या स्वातंत्र्य दिनी प्लास्टीक ध्वजाचा वापर करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.

स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम झाल्यानंतर खराब झालेले, फाटलेले, रस्त्यांवर पडलेले, माती लागलेले राष्ट्रध्वज कार्यक्रम स्थळी इतरत्र पडलेले आढळतात. राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता होय. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होता कामा नये. राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक असल्याने स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी, सुजाण व जागरुक नागरिक, ग्रामपंचायत, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, तालुका माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, आरोग्य संस्था, सर्व खाजगी संस्था यांनी स्थानिक पोलिस यंत्रणेच्या मदतीने प्लास्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर होणार नाही, याबाबत काळजी घ्यावी.

तसेच विक्रेत्यांनी प्लास्टीकच्या राष्ट्रध्वजाची विक्री करु नये. प्लास्टीकचे ध्वज आढळून आल्यास संबंधित तहसीलदार किंवा नगरपालिका कार्यालयात असे ध्वज जमा करावेत. तसेच १५ ऑगस्ट  या कार्यक्रमाप्रसंगी जिल्ह्यातील नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी प्लास्टीक राष्ट्रध्वजाचा वापर करु नये, असेही आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad