Post Top Ad
सोमवार, १० ऑगस्ट, २०२०
जिल्ह्यात नव्याने कोरोना रूगाणांची संख्या १५९
न्यूयाॅर्क हे शहर जगातील संक्रमित शहर म्हणुन पुढे आला होता. या शहरात दररोज कोरोना मुळे ७०० लोकांचा मृत्यू होत होता. मात्र दोन कोटी लोकांच्या स्वयंशिस्तीमुळे कोरोना संसर्गाला हार मानावी लागली. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांनी न्यूयाॅर्क चा आदर्श डोळ्यापुढे ठेवून कोरोना पासून सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याची नितांत गरज आहे.
यवतमाळ जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून आज दि. १० ऑगस्ट रोजी नव्याने १५९ पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडली असून दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला. तसेच आयसोलेशन वॉर्ड आणि विविध कोव्हीड सेंटरमध्ये भरती असलेले ७९ जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आज (दि. १० ऑगस्ट ) मृत झालेल्यांमध्ये पुसद शहरातील लक्ष्मीनगर येथील ६२ वर्षीय पुरूष व ग्रीन पार्क येथील ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे.
नव्याने पॉझिटीव्ह आलेल्या १५९ जणांमध्ये पांढरकवडा शहरातील १२ पुरुष व १६ महिला, पांढरकवडा ग्रामीण भागातील पाच पुरूष व चार महिला, उमरखेड शहरातील २४ पुरुष व १४ महिला, उमरखेड ढाणकी भागातील चार पुरूष व दोन महिला, नेर शहरातील पाच पुरुष व चार महिला, नेरजवळील घारफळ येथील एक पुरूष, महागाव शहरातील सात पुरुष व सात महिला, महागाव ग्रामीण मध्ये शेनड येथे सहा पुरुष व दोन महिला, बेलदरी येथील दोन पुरूष व दोन महिला, यवतमाळ शहरातील १२ पुरुष व १३ महिला असून त्यात दलीत सोसायटी येथील एक पुरूष व एक महिला, शास्री नगर येथील एक पुरूष, मातोश्री नगर येथील दोन पुरूष व दोन महिला, नवप्रभात चौक माळीपुरा येथील दोन पुरूष व दोन महिला, गोधणी रोड येथील तीन महिला, गोदाम फैल येथील एक पुरूष व दोन महिला, लक्ष्मी नगर येथील एक पुरूष, पाटीपुरा येथील दोन पुरूष व एक महिला यांचा समावेष आहे. यवतमाळ ग्रामीणमध्ये बोरगाव येथील एक पुरूष, पुसद शहरातील सुभाष वार्ड येथील एक पुरूष, शिवाजी चौक येथील दोन महिला, गणेश वार्ड येथील एक पुरूष, उदासी वार्ड येथील एक पुरूष व एक महिला, मोती नगर येथील एक पुरूष, गवळी लेआऊट येथील एक महिला, आर्णी शहरातील राणाप्रतापनगर येथील एक महिला, दिग्रस शहरातील शासकीय रुग्णालयाजवळील एक पुरूष, दारव्हा शहरातील आठवडी बाजार येथील एक पुरूषाचा समावेष आहे.
जिल्ह्यात सोमवारी दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु आणि पॉझिटीव्ह टू निगेटिव्ह' झालेल्या ७८ जणांना सुट्टी झाल्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ४९५ आहे. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या १७५८ झाली आहे. यापैकी १२१७ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 46 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात १३८ जण भरती आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सोमवारी ८२ नमुने पाठविले असून सुरवातीपासून आतापर्यंत २७७८९ नमुने पाठविले आहे. यापैकी २६१४५ प्राप्त तर १६४४ अप्राप्त आहेत. तसेच २४३८७ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.
Tags
महाराष्ट्र#
Share This
About TeamM24
महाराष्ट्र
लेबल:
महाराष्ट्र
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Post Top Ad
Author Details
मराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response