Breaking

Post Top Ad

गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२०

'टिपेश्वर जंगलात वाघाची दहशत'

'टिपेश्वर जंगलात वाघाची दहशत'

अंधारवाडी शिवारात आढळला वाघ
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवाडा येथील टिपेशवर जंगलात, कोपामंडवी लगतच्या अंधारवाडी शेतशिवारात वाघाचा वावर आहे . काही दिवसांपूर्वी या वाघाने अंधारवाडी शेतशिवारात एका शेतात आरामात पहुडल्याचे शेतकरी आणि शेतसमजुरांना दिसले होते.

त्यामुळे 'वाघाने'  ३ बकऱ्या ठार मारले होते .आजही याच भागात वाघाने एका गाईला ठार मारले.त्यामुळे  नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आजही  या वाघाचे अनेकांना दर्शन झाले आहे. सध्या खरिपाचा हंगाम सुरु असल्याने शेतात निंदण,डवरणी आणि फवारणीचे कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहे. या वाघाच्या धास्तीने शेतकऱ्यांमध्ये धास्तीने वातावरण पसरले आहे . 

गावातील नागरिकांनी वनविभागाकडे या वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.सध्या गावकरी लाठ्या काठ्या घेऊन या वाघाचा शोध घेत आहे. हा वाघ गावकऱ्यांचा हातात सापडल्यास वाघाचे काही बरे वाईट झाल्याशिवाय राहणार नाही अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. त्या अनुषंगाने वनविभागाने त्वरित पाऊले उचलून या वाघाला पकडण्याची मागणी वन्यजीव प्रेमी करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad