बुधवारी मृत झालेल्या दोन जणांमध्ये यवतमाळ शहरातील लक्ष्मीनगर येथील ६५ वर्षीय महिला आणि ढाणकी रोड, उमरखेड येथील ७५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. आज पॉझिटीव्ह आलेल्यांमध्ये पुसद तालुक्यातील श्रीरामपुर येथील एक पुरुष व पिंपळगाव येथील एक महिला, पुसद शहरातील वसंतनगर येथील तीन महिला व एक पुरूष, उमरखेड शहरातील दोन पुरुष व दोन महिला, नेर तालुक्यातील घारफळ येथील एक महिला, नेर शहरातील तीन महिला, दारव्हा शहरातील एक पुरूष व एक महिला, पांढरकवडा येथील एक पुरूष, यवतमाळ शहरातील नेहरू चौक येथील एक पुरुष व एक महिला, वंजारीफैल येथील एक पुरूष, संजीवनी हॉस्पीटल येथील एक पुरूष, वडगाव येथील एक महिला, विश्वकर्मा नगर पिंपळगाव येथील दोन महिला, पॉझिटीव्ह आले आहेत.
जिल्ह्यात मंगळवारपर्यंत ४४० ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्ण होते. यात एकाचा मृत्यु झाल्याने ही संख्या ४३९ झाली. यात आज नव्याने २५ पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडली. त्यामुळे ही संख्या ४६४ झाली. मात्र यापैकी एकाचा मृत्यु आणि ‘पॉझिटीव्ह टू निगेटिव्ह’ झालेल्या १०२ जणांना सुट्टी झाल्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ३६१ ऐवढी आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या १३०९ झाली आहे. यापैकी ९१२ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३६ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात १३१ जण भरती आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने बुधवारी 76 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत २१७३२ नमुने पाठविले असून यापैकी १७५५९ प्राप्त तर ४१७३ अप्राप्त आहेत. तसेच १६२५० नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response