Breaking

Post Top Ad

शनिवार, २९ ऑगस्ट, २०२०

'महालक्ष्मी साक्षात प्रगट होते तेव्हा'...

'महालक्ष्मी साक्षात प्रगट होते तेव्हा'...
सध्या कोरोना संकटामुळे घरगुती महालक्ष्मी उत्सव साजरा केल्या जात आहे. मात्र आर्णी,यवतमाळ येथे एका मोलमजुरी करणाऱ्यांच्या घरी जमिनीतून चक्क महालक्ष्मीची मूर्ती वर आल्याने मोठा चमत्कार घडल्याची घटना आर्णी येथील महाकाली मंदिर परिसरात घडली.

आर्णी येथील अर्चना किशन मडावी यांच्या स्वप्नांत दि.२८ ऑगस्ट च्या रात्री महालक्ष्मी देवीने दर्शन दिले.आणि देवी म्हणाली की, "मी तुला उद्या दर्शन देइल". तद्नंतर सकाळी साडे अकराच्या सुमारास कुडाच्या घरात आपोआप महालक्ष्मीच्या मूर्ती जमिनीतून वर आली त्यामुळे सदर महिलेला काय करावं ते कळत नव्हतं त्यामुळे घटनेची माहिती शहरात वाऱ्या सारखी पसरल्याने मडावींच्या घरी देवीचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी प्रचंड प्रमाणात गर्दी केली.

आपल्या देशात महालक्ष्मी ला सर्वच समाजातील लोक मानतात.त्यामुळे महालक्ष्मी घरोघरी बसवण्याची प्रथा खुप जुनी आहे. अशात आर्णी येथील अर्चना मडावी या महिलेच्या स्वप्नात देवीने शुक्रवारच्या रात्री दर्शन दिले आणि उद्या साक्षात मी तुला दर्शन देईल. त्या नंतर शनिवारी मोडलेल्या झोपडीत महालक्ष्मीने साक्षात प्रगट झाल्याने अनेकांच्या भुव्या उडाल्या. यावेळी हजारो नागरिकांनी दर्शनासाठी मोठी रिघ लावली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad