अन्याय अत्याचारा विरोधात वाघाची डरकाळी फोडून शेतकरी, कष्टकरी आणि सामन्य नागरिकांना न्याय मिळवून देणारी संघटना म्हणुन शिवसेनेचा उल्लेख केल्या जाते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एका हक्केवर रस्त्यावर उतरणारे शिवसैनिकांना आज स्वयंम घोषीत एका शेतकरी नेत्याच्या चुकीच्या वागणूकीमुळे खाली मान टाकण्याची वेळ आली असून 'तो स्वयंम घोषीत शेतकरी नेता' पक्षाच्या आणि सरकारच्या विरोधात उघडपणे जावून आंदोलन करित असल्याने शिवसैनिकांमध्ये जाहीर नाराजी व्यक्त केल्या जात आहे.
'त्या' नेत्याचे शिवसेनेसाठी योगदान काय?
शिवसेना म्हटलं की, आंदोलन, तोडफोड हा विषय आलाच. मात्र कुठेही आंदोलन केले नाही, पाच दहा कार्यकर्ते सोबत नाही तरी सुध्दा नेता म्हणुन मिरवणाऱ्या नेत्याचा शिवसेनेसाठी योग्यदान काय अशा प्रश्न शिवसेनेतील अनेक निष्ठावंत शिवसैनिकांना पडत आहे.
शिवसेनेत नेता होण्यासाठी अनेक संकटाचा सामना करून घरादारावर तुळसी पत्र ठेवावा लागतो.तेव्हा कुठे तो पदाधिकारी लोकनेता होतो.मात्र अलीकडे एका वयोवृद्ध नेत्याने पद वाचविण्यासाठी भाजप मधून कोंलाडी मारून चार भींतीच्या आत मातोश्री वर जावून पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जबरदस्तीने शिवबंधन बांधून घेतले. कारण पाच दहा कार्यकर्ते त्या नेत्या मागे नाही,त्यामुळे गुपचूप पक्षप्रवेश उरकवला. मात्र शेतकरी, कष्टकरी यांचे प्रश्न सोडविण्या एवजी 'तो स्वयंम घोषीत शेतकरी नेता' थेट सरकार विरोधात आणि स्थानिक नेत्यां विरोधात जाहीर पणे काम करित असल्याने निष्ठावंत शिवसैनिक त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे. त्या शेतकरी नेत्याने त्यांच्या राहणीमानात बदल न केल्यास शिवसैनिक त्याला भर रस्त्यावर धडा शिकवणार असल्याची चर्चा शिवसेनेत सुरू आहे.
मानसिक संतूलन बिघडलं
स्वयंम घोषीत शेतकरी नेत्याचे काही दिवास पासून मानसिक संतूलन बिघडल्याची चर्चा असून वय वाढत असल्याने नेमकं कुठे काय बोलायचं, कशासाठी आंदोलन करायचं हेच त्या नेत्याला समजत नसल्याने जिल्हात विनोदाचा विषय बनला आहे. जिल्हाबाहेरील शेतकऱ्यांचे प्रश्न कोण सोडवणार? जिल्हामध्येच नौटंकी कशासाठी? भाजपने स्पेशल शिवसेना संपवण्यासाठी तर त्याला पाठवलं नाही ना असे अनेक प्रश्न शिवसैनिकांना पडत आहे.
जिल्ह्यासह राज्यात अनेक निष्ठावंत शिवसैनिक असताना स्वार्थी नेत्याला पदावर कशासाठी बसवण्यात आले. शिवसैनिकांना त्या स्वयंम घोषीत शेतकरी नेत्याच्या जागी बसवल्यास शिवसेनेला मोठ्या प्रमाणात फायदा तर होईलच मात्र निष्ठावंत शिवसैनिकांला काम करण्याची एक संधी उपलब्ध होईल अशी भावना अनेक शिवसैनिक बोलून दाखवत आहे. काही 'चॅनल'च्या प्रतिनिधींना हाताशी धरून मीच शिवसेनेचा नेता असल्याचे सांगुन काही चर्चा मध्ये भाग घेत असल्याचे समजते. विदर्भात शिवसेनेतील पदाधिकारी नेता किंवा उपनेता पद देण्यात आलेलं नसताना हा स्वयंम घोषीत शेतकरी नेता जाहीरपणे "मी"च शिवसेनेचा नेता आहे असे सांगायला विसरत नाही. नौटंकी करणाऱ्या स्वयंम घोषीत नेत्याचा राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्वरीत बाहेरचा रास्ता दाखवावा अन्यथा शिवसेनेला विदर्भात मोठा नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response