शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत १८००६ नमुने पाठविले असून यापैकी १४७३० प्राप्त तर ३२७६ अप्राप्त आहेत. तसेच १३६१५ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.
Post Top Ad
शनिवार, १ ऑगस्ट, २०२०
चिंताजनक: यवतमाळ जिल्हात नव्याने ३९ पॉझिटीव्ह रूग्णांची भर
आर्णी शहर हादरला
सध्या जिल्हात कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना आर्णी शहरात नव्याने शनिवारी तब्बल १४ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आल्याने जिल्हाच्या यादी आर्णी शहराच्या नाव झळकला. शनिवारी आलेल्या कोरोना पाॅझिटिव्ह अवाहलात शहरातील महिला ७, पुरूष ४, लहान मुली २ आणि एक मुलगा असे मिळून एकुण १४ जण कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आले. आर्णी शहर व तालुक्यात आता पर्यंत दोन जण पॉझिटीव्ह निघाले होते.मात्र एकाच दिवशी १४ जणांचा अवाहल पॉझिटीव्ह आल्याने नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची आवश्यकता आहे.
यवतमाळ, दि. १ ऑगस्ट : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच जिल्ह्यातील विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले ६५ जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा आज (दि.१ ऑगस्ट ) मृत्यु झाला असून नव्याने ३९ पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडली आहे.
शनिवारी मृत्यु झालेल्या दोन जणांमध्ये एक जण यवतमाळ शहरातील तेलीपुरा येथील ६० वर्षीय पुरुष आणि दुसरा व्यक्ती दिग्रस शहरातील वॉर्ड क्रमांक १ येथील ७० वर्षीय पुरुष आहे. जिल्ह्यात एकूण मृत्युची संख्या २९ झाली आहे. आज पॉझिटीव्ह आलेल्या ३९ जणांमध्ये १९ पुरुष व २० महिलांचा समावेश आहे. यात यवतमाळ शहरातील कोहीनूर सोसायटी येथील एक पुरुष, नेहरू चौक येथील एक पुरुष, तेलीपुरा येथील एक पुरुष, प्रजापती नगर येथील एक पुरुष व एक महिला, पिंपळगाव येथील एक पुरुष, गजानन नगर येथील एक महिला तसेच यवतमाळ शहरातील आणखी एक महिला, दिग्रस शहरातील एक पुरुष व एक महिला, पांढरकवडा शहरातील शिवाजी नगर येथील एक पुरुष तसेच पांढरकवडा शहरातील चार पुरुष व तीन महिला, पुसद शहरातील बारी नगर येथील एक पुरुष, पुसद शहरातील गोकूल नगर येथील दोन महिला, आर्णी शहरातील पाच पुरुष व नऊ महिला, महागाव शहरातील एक पुरुष व एक महिला, वणी शहरातील एक पुरुष व एक महिला पॉझिटीव्ह आले आहेत.
जिल्ह्यात शुक्रवार पर्यंत ४५१ ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्ण होते. यात शनिवारी ४१ नवीन रुग्णांची भर पडल्याने हा आकडा ४९२ वर पोहचला. मात्र दोन जणांचा मृत्यु झाल्याने व 'पॉझिटीव्ह टू निगेटिव्ह' झालेल्या ६५ जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्याने सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ४२५ आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या १११५ झाली आहे. यापैकी ६६१ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात २९ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात १०२ जण भरती आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Post Top Ad
Author Details
मराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response