उमरखेड तालुक्यातील ढाणकी या गावा सह परिसरातील गेल्या वीस वर्षा पासून सातत्याने संजय भोसले हा लेखणीच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न शासन व प्रशासन दरबारी मांडतोय. अशात ते दि.१२ ऑगस्ट रोजी यवतमाळ येथील कोविड सेंटर मध्ये उपचारासाठी भर्ती झाले. दरम्यान काही दिवसा आधी नावालाच पत्रकार असलेल्या भ्याड माणंसाने नको ते आरोप जिल्हा प्रशासना वर केल्याने मोठी खळबळ उडाली होती.
मात्र आज दैनिक सकाळ चे ढाणकी येथील वार्ताहर संजय भोसले यांनी कोरोना कोविड सेंटर मधील मिळत असलेल्या सोई सुविधा आणि डाॅक्टर, नर्स व सर्व कर्मचाऱ्यांचे तोंड भरून कौतुक करणारी पोस्ट सध्या व्हाॅट्सअप सह सोशल मिडीयावर व्हायरल झाली. त्यामुळे आरोप करणारा आणि प्रसिद्धी साठी हापापलेल्या त्या बोगस पत्रकाराचा खरा चेहरा या निमित्ताने समोर आला. संजय भोसले हा खरा खुरा पत्रकार आहे आणि पत्रकार हा "ज्या ठिकाणी सुर्याचा प्रकाश पडत नाही ना,तिथे पत्रकारांच्या कॅमेऱ्याचा लाईट पडतो हे सत्य आहे." त्या अनुषंगाने पत्रकार संजय भोसले यांनी सत्य परिस्थितीवर भाष्य करणारी पोस्ट लिहिल्याने जिल्हाधिकारी सह आरोग्य विभागाचे कौतुक होत आहे.
|
संजय भोसले, दैनिक सकाळ |
यवतमाळ कोविड सेंटर येथुन दै सकाळ बातमीदार संजय भोसले लिहतो...
सर मागिल १२ ऑगस्ट ला मी यवतमाळ कोविड सेंटरला भरती झालो खुपच भिती वाटत होती की, शासकीय रुग्णालयात काय चांगल्या सुविधा मिळतील. खाण्या पिण्याचे वांदे होतील .राहण्याची सुविधा मिळणार नाही आपली काळजी घेणार कोणी नाही सोबत कोणी घरचा सदस्य राहणार नाही भयभीत झालो होतो.
सर आज मला पुर्ण दहा दिवस कोविड सेंटरला झाले . मला खुप मोठा चांगला अनुभव आला. आपल्या जिल्हाधिकारी, आरोग्य विभाग, खुपच चांगल्या पध्दतीने कोविड सेंटरचे नियोजन केले . सर्व रुग्णाला सकस आहार मिळेल याची तंतोतंत काळजी घेण्यात आली. सकाळी आठ वाजता चहा, साडे नऊ ला नास्ता तेही गरम, दुध ब्रेड,साडे बारा वाजता जेवन पोळी ,भात ,भाजी, वरण, लोणचे, कांदा. एक अंडे, शेंगदाना लाडु , ड्राय फुड बदाम, पेंडखजुर,पाक अवळा , दुपारी ४ वाजता चहा. पुन्हा रात्री ८ वाजता जेवन त्याच बरोबर सर्व आरोग्य सुविधा दर दोन तासात ऑक्सिजन चेक अप, बि.पी ची तपासनी सकाळी ६ वाजता औषध गोळ्या ,सलाईन, इंजेक्शन, दर दोन तासात रुग्णाला व्हिजीट सार काही नियोजन बद्द. खरतर कोविड सेंटरवर काम करण्याऱ्या डॉक्टर, नर्स, वाड बॉय. सफाई कामगार हे खरे कोविड योध्दा आहे.
|
कोविड सेंटर मधिल अन्न |
सतत अंगात पिपिई कीट घालुन काम करणे म्हणजे जिव घुटमळत ठेवने होय . सतत पॉजिटीव रुग्णाचा संपर्क,मनात कोणतीही भिती न ठेवता आपुलकीने रुग्णाची विचार पुस करतात, खरे सामाजीक कामे या कोविड योध्दाचे आहेत सलाम त्यांच्या कार्याला. सफाई कामगार दररोज सफाई करतात. दिवसातुन दोनदा सॅनिटाझर रुम केली जाते एका रुम मध्ये दोन रुग्ण असतात.खरी कमाल त्या भाऊची आहे जे रात्रण दिवस ऑक्सीजन सिलेंडर बदलुन रुग्णाचे प्राण वाचवतात एक मिनीटही ऑक्सीजन कमी पडु देत नाहीत. सर्वच आरोग्य. कर्मचाऱ्यांची आपल्या प्राणाची बाजी लावताना दिसुन येतात.जिल्हाधिकारी, आरोग्य विभाग, आरोग्य कर्मचारी,डॉक्टर, सिस्टर, सफाई कर्मचारी, या कोविड योध्दाचे कसे आभार मानावे त्या साठी माझाकडे शब्दच उरले नाही. सह ह्रुदय सलाम त्यांच्या कार्याला.
संजय भोसले, दैनिक सकाळ संपर्क नंबर 8483842375
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response