यवतमाळ : जिल्ह्यात शनिवारी २४ तासात १५५ जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर नव्याने जिल्ह्यात १७२ जण पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला
वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार सद्यस्थितीत जिल्ह्यात ७१४ ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये ५९१ जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ८०९४ झाली आहे. यापैकी ६५४२ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात २४७ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात २८६ जण भरती आहे.
मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील ६९ वर्षीय पुरुष, पांढरकवडा शहरातील ७५ वर्षीय पुरुष आणि महागाव तालुक्यातील ५६ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. नव्याने पॉझिटीव्ह आलेल्या १७२ जणांमध्ये १०४ पुरुष व ६८ महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील पुरुष १४ व नऊ महिला आणि यवतमाळ तालुक्यातील दोन पुरुष, उमरखेड शहरातील पुरुष १६ व २२ महिला, घाटंजी शहरातील पुरुष १८ व एक महिला, पुसद शहरातील १३ पुरुष व पाच महिला, बाभुळगाव शहरातील एक पुरुष व चार महिला, दारव्हा शहरातील पाच पुरुष व तीन महिला, दारव्हा तालुक्यातील एक पुरुष, दिग्रस शहरातील दोन महिला, कळंब शहरातील एक पुरुष व एक महिला, कळंब तालुक्यातील एक पुरुष, महागाव शहरातील सात पुरुष व तीन महिला, महागाव तालुक्यातील दोन पुरुष, नेर शहरातील आठ पुरुष व नऊ महिला, पांढरकवडा शहरातील चार पुरुष व पाच महिला, पांढरकवडा तालुक्यातील एक पुरुष, राळेगाव शहरातील एक पुरुष, वणी शहरातील सात पुरुष व दोन महिला, वणी तालुक्यातील दोन पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response