यवतमाळ : जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधीतांची संख्या वेगाने वाढत असून गत दिवसभरात सर्वाधिक ४२३ पॉझिटीव्ह रुग्णांची नव्याने भर पडली आहे तर पाच कोरानाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. तसेच आयसोलेशन वॉर्ड व विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले २०८ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
नेर मध्ये आठ दिवसा पुर्वी एकाच घरातील दोघांचा कोरोना मुळे मृत्यू झाला. त्यात पुन्हा त्याच घरातील तिसऱ्या व्यक्तींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना या जागतिक संकटाला गांभीऱ्यांने घेतलेले दिसत नसल्याने दररोज पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. आज दि. ११ सप्टेंबर रोजी तर कोरोना ने कहरच केला आणि ४२३ जण पाॅझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे नागरिकांनी कोरोना ला न घाबरता गांभीऱ्यांने घेवून नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
मृत झालेल्या पाच जणांमध्ये पांढरकवडा शहरातील ४० वर्षीय पुरुष व ६५ वर्षीय महिला, उमरखेड शहरातील ६५ वर्षीय पुरुष, दिग्रस शहरातील ४९ वर्षीय पुरुष आणि आर्णी तालुक्यातील ८४ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. तसेच गत २४ तासात नव्याने पॉझिटीव्ह आलेल्या ४२३ जणांमध्ये २५२ पुरुष २५२ आणि महिला १७१ आहेत. यात आर्णी शहरातील १७ पुरूष व सात महिला, आर्णी तालुक्यातील एक पुरूष व दोन महिला, बाभुळगाव शहरातील पाच पुरूष व सात महिला, दारव्हा शहरातील सहा पुरूष व दोन महिला, दारव्हा तालुक्यातील सहा पुरूष, दिग्रस शहरातील १२ पुरुष व १६ महिला, दिग्रस तालुक्यातील तीन पुरूष, घाटंजी शहरातील नऊ पुरूष व १५ महिला, घाटंजी तालुक्यातील एक महिला, कळंब तालुक्यातील एक पुरूष, केळापुर तालुक्यातील एक पुरूष, महागाव शहरातील १६ पुरूष व ११ महिला, महागाव तालुक्यातील १७ पुरूष व सहा महिला, मारेगाव शहरातील दोन पुरूष व चार महिला, नेर शहरातील तीन पुरुष व चार महिला, नेर तालुक्यातील एक पुरूष व दोन महिला, पांढरकवडा शहरातील आठ पुरुष व पाच महिला, पुसद शहरातील ५३ पुरूष व ३७ महिला, पुसद तालुक्यातील एक महिला, उमरखेड शहरातील १९ पुरुष व ११ महिला, वणी शहरातील १६ पुरुष व १५ महिला, वणी तालुक्यातील तीन पुरूष, वर्धा शहरातील एक पुरूष, यवतमाळ शहरातील ४६ पुरुष व २१ महिला, यवतमाळ तालुक्यातील तीन पुरूष व एक महिला, झरी जामणी शहरातील एक पुरूष व तीन महिला, झरी जामणी तालुक्यातील दोन पुरूषांचा समावेश आहे.
जिल्ह्यात सद्यस्थितीत १२१० ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्ण असून होम आयसोलेशनमध्ये ३२६ जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ५२४७ झाली आहे. यापैकी ३५७२ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात १३८ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात ३२६ जण भरती आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response