जिवनात जर कुणाचं चांगल करता येत नसेल तर निश्चितच करू नका,पण आयुष्यात चांगली माणसं जोडायला शिका,कारण चांगली माणसं आरसा आणि सावली सारखी असतात.आरसा कधी कुणाशीही खोटं बोलत नाही अन् सावली कधीही कुणाची साथ सोडत नाही.असे सुसंस्कार बालपणा पासूनच मेंदुवर बिंबवणाऱ्या बहुजनांचे नेते स्व.रामजी भाऊ आडे यांचे सुपुत्र आणि सर्वधर्मसमभाव अशी पंचक्रोषीत ओळख असणाऱ्या आर्णी नगरीचे प्रथम नगराध्यक्ष अनिल आडे हे राजकारणाच्या सारीपाटावरील अजातशत्रु आहेत.
देव,देश,धर्म परंपरा या बाबतच सुजाण अभिमानातुन आलेली निष्ठेची भावना जोपासत वडिल रामजी आडे यांचा विचारांचा गाडा हाकत शोषित पिडीतांच्या दुःखावर फुंकर घालून मायेच्या ममतेने कुरवाळणारा युवानेता म्हणुन अनिल आडेंची संपुर्ण जिल्ह्यात ओळख आहे. आजच्या राजकारणात पाठीवर खंजीर खुपसुन एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या काळातही त्यांचे सर्वच पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांसोबत अगदी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. रक्तांपलीकडेच ॠणानुबंध आहेत."गर्दी"मध्ये आपली माणसं ओळखायला शिकलात तर संकटच्या वेळी आपली माणसं "गर्दी"करायला विसरत नाहीत.हे आर्णी शहर सह तालुक्यातील जनतेने उदार अंतकरणाने विविध निवडणूकीच्या माध्यमातून वेळोवेळी दाखवून दिले आहेच.Post Top Ad
मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२०
राजकारणाच्या सारीपाटावरील अजातशत्रु : अनिल रामजी आडे
बहुजनांचे नेते स्व.रामजी आडे असतील किंवा प्रथम नगराध्यक्ष अनिल आडे असतील किंबहुना अनिल आडे यांच्या अर्धांगीणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे असतील, या परिवारातील अनेकांना आभाळा एवढं मोठे केलंय. मात्र आडे परिवारातील एकाही नेत्यांनी सत्तेची नशा कधीही डोक्यात मध्ये शिरू दिली नाही,हे विशेष.सदैव जिभेवर साखर घेवून फिरणारा हा परिवार आजही शहरासह ग्रामीण भागातील अवघ्या जणांच्या काळजावर अधिराज्य करतोय.
दगडात देव आहे हे समजावण्यात धर्म यशस्वी झाला.मात्र माणसात माणुस आहे.हे समजावण्यात धर्म अयशस्वी झाला,याचे शल्य कायम स्व.रामजी आडे सह युवानेते अनिल आडेंना बोचत आले आहे. जात हा अपघात आहे.त्याबदल कधीच "गर्व" करू नका,कारण "काळ"आणि "वेळ" आल्यावर जातीचं नाही तर माणुसकीचं रक्त कामाला येत असतो हा विचार पेणारा म्हणजे उमळत नेतृत्व अनिल आडे हे आहे. ज्यांचे जसे चारित्र्य असते,त्यांचे तसे मित्र असतात शुध्दता तर विचारांमध्ये असते,माणुस कुठे पवित्र असतो.फुलात सुद्धा किडे पडतात.दगडात पण हिरे असतात.वाईट सोडून चांगले बघा,माणसात सुध्दा "देव" दिसेल माणुस मळका असला तरी चालेल पण "जळका" असु नये हि बाराखडी तमाम मानवी मेंदुवर बिंबवणाऱ्या आर्णी नगरीचे प्रथम नगराध्यक्ष तथा युवानेते अनिल आडे यांना भावी जीवनातील आरोग्य आणि सुख,संपदेसाठी आभाळ भर शुभेच्छा.!
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Post Top Ad
Author Details
मराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response