Breaking

Post Top Ad

गुरुवार, १० सप्टेंबर, २०२०

'पालकमंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयात कोरोनाचा प्रवेश'


'पालकमंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयात कोरोनाचा प्रवेश'

पालकमंत्री संजय राठोड यांचे जनसंपर्क कार्यालय

राज्याचे वनमंत्री तथा यवतमाळ जिल्हाचे पालकमंत्री संजय राठोड यांचा जनसंपर्क  कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती हव्या सारखी झपाट्याने पसरल्याने मोठी खळबळ उडाली आहे.


"कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न" 

जिल्ह्यात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी एम.डी.सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा प्रशासनातील सर्व अधिकारी-कर्मचारी दिवस रात्र एक करित आहे. मात्र नागरिक कोरोना आटोक्यात आणण्यासाठी शासन आणि प्रशासनाने केलेल्या सुचनाचे पालन करतांना दिसत नाही, परिनामी दररोज कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलेल्या सुचनाचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासना कडून करण्यात येत आहे.

 

पालकमंत्री संजय राठोड यांचे यवतमाळ शहरात विदर्भ हाऊसिंग सोसायटी मध्ये जनसंपर्क कार्यालय आहेत. कार्यालयात दररोज समस्या घेवून येणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे कार्यालयातील १२ पैकी ९ कर्मचाऱ्यांचा अवाहल पाॅझिटिव्ह आल्याची माहिती आहे.एकंदरीत पालकमंत्री राठोड यांच्या कार्यालयात 'कोरोना'ने प्रवेश केल्याचे समोर आले आहे.


राज्याचे वनमंत्री,पुनर्वसन तथा जिल्हाचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या बारा पैकी ९ जणांना कोरोना झाल्याची माहिती आहे. त्यामुळे पालकमंत्री राठोड यांचा जनसंपर्क कार्यालय किती दिवस बंद राहणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad