शहरात तोंडाला मास्क न लावता फिरणाऱ्यांवर कारवाई
जिल्ह्यात कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या आणि मृतकांची संख्या दररोज वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने सर्वांनी मास्क लावून घरा बाहेर पडणे बंधनकारक केले असताना काही जण निष्काळजीपणाने बाहेर फिरताना आढळून आल्याने जिल्हाभरात विना मास्क फिरणाऱ्यांवर पोलीसांनी कारवाई करून दंड वसूल केलं आहे.
मृत झालेल्या सात जणांमध्ये यवतमाळ शहरातील नवजात बालक, ५२ वर्षीय पुरुष, ६० वर्षीय पुरूष, ६० वर्षीय महिला, तालुक्यातील ६५ वर्षीय पुरूष, आर्णी शहरातील ६० वर्षीय पुरुष आणि पुसद शहरातील ६५ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. तसेच नव्याने पॉझिटीव्ह आलेल्या १७२ जणांमध्ये १०१ पुरुष व ७१ महिला आहेत.
वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार सद्यस्थितीत जिल्ह्यात १५८८ ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये २९२ जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ६५६७ झाली आहे. यापैकी ४५०५ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात १८२ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात २९२ जण भरती आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत ६४९९८ नमुने पाठविले असून यापैकी ६३८५६ प्राप्त तर ११४२ अप्राप्त आहेत. तसेच ५७२८९ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response