यवतमाळ : जिल्ह्यात नव्याने नवीन पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडली असून तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाल्याने मृत्यू चा आकडा दोनशे च्या जवळ पोहचला आहे. तर वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले ६६ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
आर्णीत कोरोनाचे रूग्ण वाढताय
आर्णी शहरात कोरोनाची रूग्ण संख्या कमी होताना दिसत नाही, संख्या कमी करण्याच्या दृष्टीने व्यापारी वर्गांनी बाजार पेठेत बंद ठेवली.मात्र अशाही प्रस्थितीत शहरात प्रचंड गर्दी होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाला हरविण्यासाठी शासन आणि प्रशासनाने दिलेल्या सुचनाचे पालन करण्याची आवश्यकता आहे.
मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील ६६ वर्षीय महिला, तालुक्यातील ६२ वर्षीय पुरुष आणि वणी शहरातील ५४ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच नव्याने पॉझिटीव्ह आलेल्या १७६ जणांमध्ये ११० पुरुष व ६६ महिला आहे. यात आर्णी शहरातील सात पुरुष व चार महिला, बाभुळगाव शहरातील एक पुरुष व दोन महिला, दिग्रस शहरातील दोन पुरुष व तीन महिला, कळंब शहरातील चार पुरुष व चार महिला, महागाव शहरातील दोन पुरुष, नेर शहरातील आठ पुरुष व तीन महिला, पांढरकवडा शहरातील १३ पुरुष व आठ महिला, पुसद शहरातील १५ पुरुष व पाच महिला, उमरखेड शहरातील सात पुरुष व तीन महिला, वणी शहरातील १२ पुरुष व १९ महिला, यवतमाळ शहरातील ३९ पुरुष व १५ महिलांचा समावेश आहे. वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार सद्यस्थितीत जिल्ह्यात १४०६ ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये ३२६ जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ६९३२ झाली आहे. यापैकी ५००५ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १९५ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात २८३ जण भरती आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response