Breaking

Post Top Ad

बुधवार, १६ सप्टेंबर, २०२०

पारधी समाजाच्या विकासाकरिता अर्थसहाय्य योजना


पारधी समाजाच्या विकासाकरिता अर्थसहाय्य योजना

यवतमाळ: पारधी विकास कार्यक्रम अंतर्गत सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांना अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. याअंतर्गत मालवाहु ऑटोरिक्षा, कुक्कुटपालन व्यवसायाकरिता अर्थसहाय्य, हळद-मिरची कांडप यंत्र पुरवठा, तसेच आटाचक्कीचा पुरवठा करण्यात येणार आहे. सदरहु योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पांढरकवडा यांचेमार्फत प्रत्यक्ष अर्ज घेऊन होणार असून लाभार्थ्यांनी ६ ऑक्टोबर २०२० पुर्वी आवश्यक कागदपत्रासह अर्ज करावे.


लाभार्थी निवडीच्या अटी व शर्तीमध्ये लाभार्थी हा प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील व पारधी समाजातील सुशिक्षीत बेरोजगार असावा ही मुख्य अट आहे.  तसेच ऑटोरिक्षा करिता लाभार्थ्याजवळ तीनचाकी वाहन चालकाचा परवाना असणे आवश्यक आहे. तर आटाचक्की करिता लाभार्थ्याकडे जागेचा 8-अ दाखला व विद्युत जोडणी आवश्यक आहे. हळद-मिरची कांडपयंत्र व आटाचक्की करिता अपंग, विधवा लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. सर्व योजनांसाठी लाभार्थ्यांचे उत्पन्न २.५ लक्ष पेक्षा अधिक नसावे तसेच दारिद्रय रेषेखालील उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार असून इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करून ठेवावी असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा चे प्रकल्प अधिकारी यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad