शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत ७३७१९ नमुने पाठविले असून यापैकी ७२६७५ प्राप्त तर १०४४ अप्राप्त आहेत. तसेच ६४३९९ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.
मृत झालेल्या चार जणांमध्ये दिग्रस शहरातील ४९ वर्षीय महिला आणि तालुक्यातील ७७ वर्षीय महिला तसेच राळेगाव शहरातील ८९ वर्षीय आणि घाटंजी शहरातील ६१ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या ८५ जणांमध्ये ४८ पुरुष तर ३७ महिला आहेत. यात आर्णी शहरातील चार पुरुष व एक महिला, बाभुळगाव शहरातील ११ पुरुष व सहा महिला, घाटंजी शहरातील दोन पुरुष, कळंब शहरातील सहा पुरुष व दोन महिला, महागाव शहरातील तीन पुरुष व एक महिला, नेर शहरातील तीन पुरुष व सहा महिला, पांढरकवडा शहरातील दोन पुरुष व सात महिला, उमरखेड शहरातील तीन पुरुष व आठ महिला, वणी शहरातील दोन महिला, यवतमाळ शहरातील १३ पुरुष व चार महिला आणि यवतमाळ तालुक्यातील एक पुरुष पॉझिटीव्ह आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार सद्यस्थितीत जिल्ह्यात ५५६ ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये ५०० जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ८२७६ झाली आहे. यापैकी ६९६६ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण मृत्युंची संख्या २५४ झाली आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात २७१ जण भरती आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response