Breaking

Post Top Ad

मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२०

'सामुहिक बलात्कार प्रकरणातील पिडीत मुलीचा मृत्यू'

'सामुहिक बलात्कार प्रकरणातील पिडीत मुलीचा मृत्यू'

उत्तर प्रदेश राज्यातील हाथरसमध्ये सामूहिक बलात्काराची शिकार बनलेल्या १९ वर्षीय पिडित मुलीचा अखेर आज सकाळी दरम्यान जगण्याची धडपड कायमाची थांबली.दिल्ली येथील एम्स रूग्णालयात 'तिने' अखेरचा श्वास घेतला.


उपाचारा दरम्यान पिडीत मुलगी शुद्धीवर आल्या नंतर तिला बोलता येत नव्हत,त्यामुळे तिचा बयाण कस नोंदवायचा हा पोलिसा समोर मोठा प्रश्न निर्माण झाला असताना मुलीने "आपल्यावर झालेले सगळे अत्याचार इशारा करून व्यक्त केले".गेल्या पंधरा दिवास पासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या पिडीत मुलीने मंगळवारी सकाळी दरम्यान अखेरचा श्वास घेतला.त्यामुळे पीडितेची जगण्याची धडपड अयशस्वी ठरली.


दलित समाजातील १९ वर्षाच्या मुलीवर दि.१४ सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये चार राक्षसांनी क्रूरपणे अत्याचार केला होता.त्यांनी केलेला वाईट कृत्य लपवण्यासाठी आणि पिडीत मुलीने काही बोलू नये यासाठी त्या चार हैवानांनी सामूहिक बलात्कारानंतर मुलीची जीभ कापली होती,तसेच पाठीचा कणाही मोडला होता.पिडितेला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केल्यानंतर सदर मुलगी तब्बल नऊ दिवसा पासून बेशुद्ध अवस्थेत होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad