Breaking

Post Top Ad

रविवार, ६ सप्टेंबर, २०२०

'तो स्वयंम घोषीत शेतकरी नेता मानसिक दृष्ट्या अस्थीर'


'तो स्वयंम घोषीत शेतकरी नेता मानसिक दृष्ट्या अस्थीर'

नगरसेवकांने का मारल्याचे दिले स्पष्टीकरण 

माणसांचं ज्या पध्दतीने वय वाढत,त्याच पध्दतीने त्यांच मानसिक संतूलन बिघडतं  याची प्रचिती शनिवारी यवतमाळ जिल्हातील पांढरकवडा येथे घडलेल्या घटनेतून दिसून आले. स्वयंम घोषीत शेतकरी नेताचं वय वर्षं जवळपास ६० ते ७० आणि याच वयात त्याने शनिवारी एका नगरसेवकाच्या हाताचा जोरदार प्रसाद खाल्ला. प्रतिष्ठित नागरिकांच्या घरी नातेवाईकांचे निधन झाले होते. त्या दरम्यान राज्याचे माजी सामाजिक न्यायमंत्री, माजी आमदार सह डझनभर नेते मंडळी घटनास्थळी उपस्थितीत होते.


एकेकाळी या स्वयंम घोषीत शेतकरी नेत्याने 'शेतकऱ्यांसाठी आभाळ चिरत नेणारा आवाज उठवून तमाम शेतकऱ्यांची मने जिंकली आणि खऱ्या अर्थाने तिथून हा स्वयंम घोषीत शेतकरी नेता हिरो बनला'.आज ह्या शेतकरी नेत्यांचे वय वाढले आहे. अशा प्रस्थितीत कोणा सोबत कस बोलावं हे देखील त्याला कळत नाही, परिनामी मानसिक संतूलन बिघडत असल्याने आणि मानसिक दृष्ट्या अस्थीर झाल्याने आडीच किलोच्या हाताचा मार सहन करण्याची वेळा थकत्या वयात त्या नेत्यांवर आली. या संदर्भात 'महाराष्ट्र24' ने बातमी अपलोड करताच जिल्हातील लाखो लोकांच्या मोबाईल वर बातमीची लिंकने धुमाकूळ घालत असल्याचे दिसून आले.


'ज्या नगरसेवकांनी' स्वयंम घोषीत शेतकरी नेत्याच्या कानाखाली आवाज काढला त्याने रात्री उशीरा व्हिडिओ च्या माध्यमातून नेमकं का मारलं या बाबत स्पष्टीकरण दिले. नको तिथे नाक खुपसण्याची सवय माणसांच्या अंगी असेल तर त्याला दणका खावावा लागतो हा निसर्गाचा नियम आहे आणि तो सर्वांनाच लागू पडतो. विशेष म्हणजे मारहाण झालेल्या स्वयंम घोषीत शेतकरी नेत्याने लाखो रूपयांचा भष्टाचार कशा केला या बाबत सुध्दा संबंधित नगरसेवकाने व्हायरल झालेल्या व्हिडिओ म्हटले आहे. आपली उंची किती, आपण बोलतो किती हे त्या नौटंकीबाज शेतकरी नेत्याला माहिती नसल्याने डझनभर आजी-माजी लोकप्रतिनिधी समोर खुलेआम मार खाण्याची वेळ आल्याने याची चर्चा जिल्हाभरात सुरू आहे.



'शिवसेनाप्रमुख ह्यात असते तर थोबाड फोडला असता'

आगलाव्या आणि स्वयंम घोषीत शेतकरी नेता हा सर्वांना माहिती आहे.पद कायम ठेवण्यासाठी त्याने अलीकडेच भाजप मधून शिवसेनेत कोलांटी मारली. हा नेता कायम वादाच्या भोवऱ्यात असतो. पक्षातील नेत्या बदल उघडपणे आणि सार्वजनिक ठिकाणी अपमानास्पद वक्तव्य करण्याची त्याची जुनी सवय आहे. त्यामुळे त्याने शनिवारी मार खाल्ला. मात्र या स्वयंम घोषीत शेतकरी नेत्या मागे दोन चार कार्यकर्ते नाही, त्याच्या पासून पक्षाला कवडीचा फायदा नाही, तरी देखील त्याला एवढ्या मोठ्या पदावर बसवलं आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यात असते तर स्वयंम घोषीत शेतकरी नेत्याचा थोबाडीत मारून बाहेरचा रस्ता दाखवला असता अशी भावना निष्ठावंत शिवसैनिक बोलून दाखवत आहे. 


सध्या कोरोना या साथरोगा मुळे सर्वच जण हैराण आहे. साथरोग नियंत्रणात आणण्यासाठी शासन व प्रशासन आहोरात्र काम करित आहे. 'स्वयंम घोषीत शेतकरी नेता' मात्र, शासन आणि प्रशासनाच्या विरोधात जावून काम करित आहे. स्वयंम घोषीत शेतकरी नेत्याने उघडपणे कोविड विरोधात काम करून लोकांमध्ये जावून "तुम्ही बिनधास्त रहा, कोरोना वगैरे काही नाही, सरकार फसवणूक करित आहे". अशी दंवडी देऊन सरकार विरोधात काम केल्याने त्यांच्यावर शासन आणि प्रशासनाने साथरोग प्रतिबंधक कायदा, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम आणि भारतीय दंड संहिता १८६० इतर संबंधीत कायदे व नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी होत आहे. कारण राज्य घटनेने सर्वांना समान अधिकर दिला आहे. देशात सर्वच पद भुषविलेल्या लोकांना सुध्दा कायद्या पुढे वाकावं  लागल्याचा इतिहास आहे. त्यामुळे ह्या स्वयंम घोषीत शेतकरी नेत्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad