यवतमाळ : आज दि.४ सप्टेंबर रोज शुक्रवार ला आयसोलेशन वॉर्ड व जिल्ह्यातील विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले १५० जण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. शुक्रवारी दिवसभरात जिल्ह्यात तब्बल नऊ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून १९७ जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत.
जिल्ह्यात मागच्या ऑगस्ट महिन्या पासून कोरोनाचा उद्रेक वाढला आहे.गेल्या ऑगस्ट महिन्यात जिल्हात कोरोनाचे सर्वांधिक रूग्ण आढळून आले. त्यामुळे दररोज कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे.
मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील ७५ वर्षीय पुरुष व इतर दोन पुरुष, राळेगाव तालुक्यातील ४४ वर्षीय महिला, दारव्हा शहरातील ५८ वर्षीय पुरुष, आर्णि शहरातील ५४ वर्षीय पुरुष, दिग्रस तालुक्यातील ६० वर्षीय पुरुष व जिल्ह्यातील इतर दोन पुरुषाचा समावेश आहे. नव्याने पॉझिटीव्ह आलेल्या १९७ जणांमध्ये पुरुष १२४ आणि महिला ७३ आहेत. यात दिग्रस शहरातील १० पुरुष व १२ महिला, पांढरकवडा शहरातील सात पुरुष व पाच महिला, पांढरकवडा तालुक्यातील तीन पुरुष व एक महिला, महागाव शहरातील ११ पुरुष व दोन महिला, उमरखेड शहरातील १० पुरुष व एक महिला, बाभुळगाव शहरातील २१ पुरुष व १० महिला, वणी शहरातील चार पुरुष, वणी तालुक्यातील दोन पुरुष, घाटंजी शहरातील नऊ पुरुष व एक महिला, घाटंजी तालुक्यातील पाच पुरुष व नऊ महिला, आर्णी शहरातील पाच पुरुष व सहा महिला तसेच तालुक्यातील एक पुरुष व एक महिला, नेर शहरातील तीन पुरुष व चार महिला, यवतमाळ शहरातील २६ पुरुष व १८ महिला तसेच तालुक्यातील एक पुरुष, दारव्हा शहरातील एक पुरुष, पुसद शहरातील चार पुरुष व दोन महिला, अकोला शहरातील एक महिला, अमरावती तालुक्यातील एक पुरुष पॉझेटिव्ह आले आहेत.
सद्यस्थितीत जिल्ह्यात ७२५ ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये तर २५१ जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या ३९२४ झाली आहे. यापैकी २८३९ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात १०८ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात २०८ जण भरती आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response