Breaking

Post Top Ad

रविवार, १३ सप्टेंबर, २०२०

'आर्णी तालुक्यात रविवारी कोरोनाचा ब्लास्ट'

'आर्णी तालुक्यात रविवारी कोरोनाचा ब्लास्ट'

दाभडी येथील रूग्णां कोविड सेंटर मध्ये नेताना अम्बुलन्स 

जिल्ह्यात कोरोना रूग्णांची झपाट्याने वाढ होत असताना आर्णी तालुक्यात रविवारी तब्बल २१ रूग्ण पाॅझिटिव्ह आढळून आल्याची माहिती आहे. सध्या कोरोना रूग्णांवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासन युध्दपातळीवर प्रयत्न करित असताना दुसरी कडे कोरोना ने ग्रामीण भागात शिरकाव केल्याचे रविवारी दिसून आले.


नागरिकांनी मास्क वापरावा:जिल्हाधिकारी एम.डी.सिंह 

नागरिकांनी मास्क वापरावा:जिल्हाधिकारी एम.डी.सिंह

सध्या दिवसं-दिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे.अशा गंभीर प्रस्थितीचा सामना करण्याच्या दृष्टीने तमाम नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी जात असताना तोंडाला मास्क वापरावा, सॅनिटाझर व फिजीकल डिस्टन्सिंग या नियमांचे काटेकोरपणे पालन करून दैनंदिन कामकाज करावा.



जवळा, कुऱ्हा आणि पोलीस विभागातील दोन कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले. दरम्यान शनिवारी  दाभडी येथील तिघांचा अवाहल पाॅझिटिव्ह आला होता.मात्र ते उपचारासाठी भर्ती न झाल्याने त्यांना रविवारी पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कोविड सेंटर मध्ये नेण्यात आले. रविवारी सकाळी दाभडी येथील कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांनी उपचारा करण्यासाठी कोविड सेंटर मध्ये जाण्यास नकार दिल्याने  आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांची साथ मिळाल्या नंतर त्या रूग्णा कोविड सेंटर मध्ये नेण्यात आले.



शनिवारी पाॅझिटिव्ह आढळून आलेल्या दाभडी येथील तीन कोरोना बाधित रुग्णांमध्ये एक वर्षाचा बाळ, ६५ वर्षीय पुरूष आणि ४५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. दरम्यान जवळा येथे रविवारी १७ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले असून कुऱ्हा येथे २ आणि पोलीस खात्यातील २ कर्मचाऱ्यांचा यात समावेश असल्याची माहिती आहे. नागरिकांनी शासन आणि प्रशासनाने दिलेल्या सुचनाचे वेळोवेळी पालन करून लक्षण दिसतात आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासना कडून करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad