नव्यानेच रूजू झालेले जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ.दिलीप भुजबळ पाटील यांनी बोलावलेल्या क्राईम बैठकीत ठाणेदारांना कानपिचक्या दिल्याची माहिती पुढे आली आहे.सध्या जिल्ह्यात 'कोरोना'च्या संकटात सुध्दा खुलेआम अवैध धंद्दे सुरू आहे.त्यामुळे पोलीस अधिक्षक क्राईम बैठकीत चांगलाच संताप व्यक्त केल्याची जोरदार चर्चा आहे.
पोलीस अधिक्षक डाॅ.दिलीप भुजबळ पाटील यांनी ठाणेदारांची तब्बल चार तास झाडाझडती घेतली.यादरम्यान उपस्थितीत उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणेदारांना सह.विविध पथकाचे प्रमुख यांना कडक इशारा देत म्हणाले की, 'आप-आपल्या पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व प्रकारचे अवैध धंद्दे त्वरीत बंद करा' अन्यथा होणाऱ्या परिणामाला तयार रहा अशा इशारा दिल्याने अनेकांचे धाबे दणाणले असल्याची चर्चा पोलीस विभागातील अधिकाऱ्यांच्या वर्तुळात सुरू आहे.
नव्याने रूजू झालेले पोलीस अधिक्षक डाॅ.दिलीप भुजबळ पाटील यांच्या साठी यवतमाळ जिल्हा नवा नाही, या आधी देखील भुजबळ पुसद उपविभागीय अधिकारी म्हणुन यशस्वी पणे जवाबदारी पार पाडली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील अवैध धंद्दे त्वरीत बंद करण्याचा निर्देश सर्व ठाणेदारांना दिला असून ठाणेदारांनी सुध्दा काल पासूनच तयारीला लागल्याची माहिती आहे. चार तास झालेल्या बैठकीत केवळ एकच विषयांवर भर देण्यात आल्याचे कळते.ज्या पोलीस स्टेशन च्या हद्दीत अवैध व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आल्यास त्या परिसरातील अधिकाऱ्यांचा पंचनामा खुद पोलीस अधीक्षक करणार असल्याने ठाणेदारांमध्ये नव्या एसपी ची मोठी दहशत निर्माण झाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response