'
यवतमाळ,घाटंजी तालुक्यातील निबंर्डा व चिंचोली या दोन गावाच्या मध्ये भागातून वाहत असलेल्या अडाण नदीच्या कमी उंचीच्या पुलावरून पुराच्या पाण्यात युवक वाहुन गेल्याची घटना घडली. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीया वर व्हायरल होत आहे. गेल्या चोवीस तासा नंतर ही पुरात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडेला नाही.
किन्ही येथील गोपी उर्फ नकुल जयसिंग जाधव वय १७ वर्ष हा युवक आपली मोटार सायकल घेऊन नदीच्या पुलावर उभा असताना एका चारचाकी वाहनाने पूराच्या पाण्यातून ओलांडण्यास सुरुवात केली त्यावेळी तिथे उभ्या असलेल्या नकुल हे सुद्धा आपले दुचाकी घेऊन 'त्या चार चाकी वाहनाच्या' मागे पुरातून रस्ता काढत असताना त्यात हा युवक वाहुन गेला.
चारचाकी वाहनाला पाण्यातून ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न वाहुन गेलेला युवक करत असताना तेवढ्या ओव्हरटेक ह्या प्रवाहाच्या बाजूने आणि विरुद्ध दिशेने करीत असताना अचानक त्या तरुणाचा गाडीवरून तोल गेला आणि क्षणातच पुलाच्या खाली पाण्यात पडला यावेळी उपस्थिती लोकांनी सदर घटनेचा चित्रीकरण मोबाईल मध्ये केलं संपूर्ण अंतर अतिशय सावधगिरीने पार करीत असताना शेवटच्या टोकाला त्या वाहनाला ओव्हरटेक करीत असताना त्याचा तोल जाऊन तो पाण्यात पडला त्यामुळे तरुणाचा 'अतिआत्मविश्वास त्याला नडला'. सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली त्यावरून सकाळ पासूनच घाटंजी पोलीस व गावकरींच्या सहकार्य यांनी नदीपात्रात उडी मारून बर्याच दुर पर्यंत युवकांचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला परंतु अद्यापही पुरात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह हाती लागले नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response