Breaking

Post Top Ad

बुधवार, ३० सप्टेंबर, २०२०

दोन कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू तर ६६ जण नव्याने पॉझिटीव्ह

दोन कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू तर ६६ जण नव्याने पॉझिटीव्ह
यवतमाळ जिल्ह्यात बुधवारी  २४ तासात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून ६६ जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहे. मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील वर्षीय ५२ व  वर्षीय ६० पुरुषाचा समावेश आहे. नव्याने पॉझिटीव्ह आलेल्या ६६ जणांमध्ये पुरुष ४८ व महिला १८ आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत ७५२४२ नमुने पाठविले असून यापैकी ७४३३४ प्राप्त तर ९०८ अप्राप्त आहेत. तसेच ६५७९८ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.


यामध्ये यवतमाळ शहरातील पुरुष १३ व पाच महिला, यवतमाळ तालुक्यातील दोन पुरुष, पांढरकवडा शहरातील दोन पुरुष व एक महिला, आर्णी शहरातील तीन पुरुष व एक महिला, दारव्हा शहरातील सात पुरुष व चार महिला, दिग्रस शहरातील दोन पुरुष व एक महिला, घाटंजी शहरातील १२ पुरुष व चार महिला, मारेगाव शहरातील पाच पुरुष, नेर शहरातील दोन पुरुष व एक महिला आणि उमरखेड शहरातील एका महिलेचा समावेश आहे. 

जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून माहिती प्राप्त न झाल्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत २७६ ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये भरती असणाऱ्यांची संख्या निरंक असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाने म्हटले आहे.  सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ८५३६ झाली आहे.  जिल्ह्यात २६४ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात २७२ जण भरती आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad