Breaking

Post Top Ad

गुरुवार, १० सप्टेंबर, २०२०

'विघुत शाॅक लागल्याने दोघे जागीच ठार'

'विघुत शाॅक लागल्याने दोघे जागीच ठार'

यवतमाळ तालुक्या अंतर्गत येणाऱ्या वंसतपूर- बोरी गोसावी येथील शेत शिवारात १६ वर्षीय दोन चिमुकल्यांना विघुत शाॅक लागल्याने जागीच ठार झाल्याची घटना आज दि.१० सप्टेंबर रोज सकाळी दरम्यान घडली.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


घटनेत ठार झालेल्या अल्पवयीन मुलांची नावे विक्की जनार्दन राठोड वय १६ वर्ष, सुरज भोपीदास राठोड वय १६ वर्ष दोघेही रा. वसंतरनगर (बोरी गोसावी) असे आहेत. लखन उत्तम राठोड यांच्या शेतात दोन्ही मुलं खत देण्यासाठी गेली होती.अशात जंगली जनावरां पासून शेत मालाचे रक्षण करण्यासाठी अवैधरित्या वीज चोरी करून तार कुंपण ला विघुत प्रवाह सोडण्यात आला होता.


गुरूवारी शेतात खत देण्यासाठी गेलेल्या विक्की आणि सुरज यांना तार कुंपण ला असलेल्या विघुत शाॅकचा जबरदस्त झटका बसल्याने ते दोघे ही यात जागीच ठार झाले. घटने नंतर लगेच आर्णी महावितरण कंपणीचे उप कार्यकारी अभियंता नरेंद्र राऊत पोहचले. त्या नंतर यवतमाळ पोलीस घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी पोहचले आहे. दरम्यान या गंभीर घटनेमुळे शेत मालकांवर गुन्हे दाखल होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. 

विजेच्या शाॅकने मृत्यू झालेल्या दोन्ही मुलं हे एकाच गावाचे आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ते दोघे जण शेतात खत देण्यासाठी गेले होते. मात्र काळाने डाव साधत त्यांच्या वर झडप मारली आणि त्यात दोघांनी जागीच जीव सोडला. या घटनेमुळे वसंतरनगर(बोरी गोसावी) परिसरातील नागरिकांवर दुःखाचा डोंगर कोसळला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad