Breaking

Post Top Ad

बुधवार, ९ सप्टेंबर, २०२०

'अभिनेत्री कंगणा राणावत हिचा पडद्या मागाचा हिरो कोण'?

'अभिनेत्री कंगणा राणावत हिचा पडद्या मागाचा हिरो कोण'?

गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड अभिनेत्री कंगणा राणावत, अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केल्या पासून सतत या-ना त्या वादाने चर्चेत राहत आली आहे. मात्र दि.३ सप्टेंबर रोजी 'कंगणा राणावत'ने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. तद्नंतर राज्यात एकच गदारोळ सुरू झाला.


बाळासाहेब ठाकरे नावाचा बाप माणूस ह्यात असते तर....

भाजप सध्या सुडाचं राजकारण करतेय हे देशातील जनता उघड्या डोळ्यांनी बघतेय. महाराष्ट्रात याच भाजप ला बाळासाहेब ठाकरे नावांच्या  बाप माणसांनी बोट धरून आणलं याचा विसर बहुतेक भाजप नेत्यांना पडलेला दिसतोय. मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणे किंवा मुंबई पोलिसांवर विश्वास राहीला नाही,अशी वक्तव्य 'बाळासाहेब ठाकरे' नावाचा बाप माणूस ह्यात असताना कोणी केलं असतं तर त्याचे काय हाल करून सोडले असते यांची कल्पना न केलेली बरचं. महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या 'हिंदी न्यूज चॅनल'च्या पत्रकारांना 'भारतरत्न' हा पुरस्कार देण्याची एकमेव मागणी राज्यातील नागरिकांमधून होत आहे.


खर तर बाॅलिवूड अभिनेत्री कंगणा राणावत हिला मुंबई आणि मुंबई पोलिसांबदल जे बोलायला नको होत, ते त्याने बोलून राज्यासह देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली. त्यानंतर शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगणा राणावत यांना सल्ला देत "जर तुम्हाला मुंबई मध्ये राहणे असुरक्षित वाटत असेल, किंवा मुंबई पोलिसांवर विश्वास नसेल तर, तुम्ही खुशाल तुमच्या राज्यात जावून रहा" असे ट्विट करून दिला. मात्र याचे कपटी राजकीय लोकांनी भांडवल करून संजय राऊत यांनी कंगणा राणावत हिला धमकी दिली असा प्रचार केला. त्यामुळे या प्रकरणात पेट्रोल ओतण्याचा काम करून खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला आणि राज्यातील नागरिकांना बदनाम करण्याचे 'पाप' भाजप मधिल काही नेत्यांनी केल्याची चर्चा आहे.


हिंदी न्यूज चॅनल कडून पत्रकारिता नासवण्याचा प्रकार

सध्या रिया चक्रवर्ती प्रकरण असोत की, कंगणा राणावत या मध्ये हिंदी न्यूज चॅनल वाले पागल झाल्या सारखे ओरडून ओरडू बोलत आहे.विशेष म्हणजे आज बुधवारी मुंबई महानगरपालिकेने कंगणा राणावत हिच्या घरा समोरील अतिक्रमण काढण्याची कारवाई केली.मात्र हिंदी न्यूज वाल्यांनी चित्र रंगवलं महाराष्ट्र सरकारने केली म्हणुन. त्यामुळे हिंदी न्यूज चॅनल वाल्यांकडून सध्या पत्रकारिता नासवण्याचा प्रयत्न होत आहे. पत्रकारितेत कायद्याची शपथ घेवून पदा वर बसलेल्या व्यक्ती बदल एकेरी भाषेत उल्लेख करणं हे कोणत्या नियमात आणि कायद्याच्या कोणत्या पानावर लिहीलं हे हिंदी न्यूज चॅनल वाल्यांनी सांगितल पाहीजे. एकंदरीत हिंदी न्यूज चॅनल चे पत्रकार हे दबावाखाली येवून विश्लेषण करित असल्याचे दिसून येत आहे.


'अभिनेत्री कंगणा राणावत हिचा पडद्या मागाचा हिरो कोण'?

अभिनेत्री कंगणा राणावत हिने वादग्रस्त वक्तव्य केल्या नंतर "मी ९ सप्टेंबर ला मुंबईत येत आहे, कोणाच्या बाप्पात हिंमत असेल तर मला अडवून दाखवा" असे ट्विट केल्या नंतर लगेच त्याला 'वाय' श्रेणी सुरक्षा देण्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह घोषणा करतात त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात वेगळा प्रश्न उपस्थिती होतोय. भाजप आणि अभिनेत्री कंगणा राणावत यांच्या महाराष्ट्रात रान उठवण्या संदर्भात आधीच ठरल होत का? अशी शंक्का या निमित्ताने उपस्थितीत होत आहे. अभिनेत्री कंगणा राणावत हि मुंबईत येताच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर एकेरी भाषेचा उल्लेख करून आज दि.९ सप्टेंबर रोजी टिका केली. राज्याचे मुख्यमंत्री पद हे कायद्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. पदावर बसलेल्या व्यक्ती बदल एकेरी शब्दात टिका करणे योग्य आहे? अभिनेत्री कंगणा राणावत हिच्या मागे भाजप आणि आर,एस,एस.तर नाही ना? विशेष म्हणजे अभिनेत्री कंगणा राणावत  हिचा पडद्या मागाचा हिरो कोण अशी चर्चा या निमित्ताने नागरिकांमध्ये सुरू आहे. अशी चर्चा या निमित्ताने सुरू आहे. 

महाराष्ट्र24 चा अॅप लवकर तुमच्या भेटीला....!




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad