विधवा महिले कडे नागरिकांचा पाहिण्याचा दृष्टिको अतिशय नकारात्मक आहे. "ती" किती ही चांगली राहीली तरी ही लोकांचा पाहण्याचा कल वाईटच असतो. कदाचित या 'माऊली'वर देखील तीच वेळ आल्याने तिने जीवन संपविला असावा? या घटनेतील विधवा महिला आणि मृतक संगिता नामदेव खापणे वय ३५ वर्ष पती नामदेव याचा आठ वर्षांपूर्वी निधन झाल्याने तेव्हा पासून मृतक माहेरीच राहत होती.
मृतक संगिता खापणे हिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. संगिताच्या जाण्याने 'ती' दोन्ही फुल पाखरू उघड्यावर पडले आहे. त्यामुळे दोन मुलांचा सांभाळ कोण करणार अशा प्रश्न नातेवाईक सह गावातील नागरिकांना पडला आहे. संगिता हिने नेमका आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल का उचलले याचा तपास पोलीसांनी करण्याची मागणी होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response