Breaking

Post Top Ad

मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२०

पत्नीला मारहाण करणे पडले महागात;पोलीस महासंचालकांची पदा वरून हकालपट्टी

पत्नीला मारहाण करणे पडले महागात;पोलीस महासंचालकांची पदा वरून हकालपट्टी

आयपीएस अधिकारी शर्मा सोबत त्यांची पत्नी(छायाचित्र टिव्टर)

मध्य प्रदेश या राज्यातील भोपाळ शहरात विशेष पोलीस महासंचालक म्हणुन कार्यरत असलेले 'पुरुषोत्तम शर्मा' यांना राज्य सरकाने तडकाफडकी पदावरून हटवले आहे.


पोलीस महासंचालक शर्मा हे त्यांच्या पत्नीला मारहाण करतानाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता.त्या व्हिडिओ ची दखल मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांनी घेतली आणि ताबडतोब पोलीस महासंचालक पुरुषोत्तम शर्मा यांना पदा वरून हटविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.त्यामुळे शर्मा यांना पत्नील मारहाण करणे चांगलेच महागात पडल्याची जोरदार चर्चा आहे.

भोपाळ या शहरात कार्यरत असलेले पुरुषोत्तम शर्मा हे पत्नीला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने ते चांगलेच चर्चेत आले होते.मात्र सरकारने व्हायरल झालेल्या व्हिडिओ ची दखल घेत शर्मा यांना तडकाफडकी पदावरून हटवले आहे.वरिष्ठ आयपीएस अधिकारी पुरुषोत्तम शर्मा यांची काही दिवसा पुर्वी भोपाळ च्या विशेष पोलीस महासंचालक पदी निवड करण्यात आली होती.मात्र खुद शर्मा पत्नीला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्यांना पदावरून हटवल्याचे मुख्यमंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad