Breaking

Post Top Ad

गुरुवार, ३ सप्टेंबर, २०२०

जिल्ह्यात कोरोनाचा ब्लास्ट;नव्याने १२४ जण पॉझिटीव्ह

जिल्ह्यात कोरोनचा ब्लास्ट;नव्याने १२४ जण पॉझिटीव्ह
यवतमाळ : गुरूवारी दिवसभरात जिल्ह्यात तब्बल सात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाल्याने आतापर्यंत मृत्युची एकूण संख्या ९९ झाली आहे. तर जिल्ह्यात १२४ नवीन पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडली असून  आयसोलेशन वॉर्ड व विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेल्या २२ जणांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा ब्लास्ट होत असताना बिनधास्त फिरणाऱ्यांची संख्या काही कमी नाही, त्याच अनुषंगाने जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी बुधवारी रात्री दहा वाजता दरम्यान सायकलने फेरफटका मारून शहरातील प्रस्थितीचा आढावा घेतला त्या दरम्यान अनेक जण बिनधास्त पणे फिरत असल्याचे आढळून आले.


मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील ६४ वर्षांची महिला, ८२ वर्षीय पुरुष व ६७ वर्षीय पुरूष, बाभुळगाव तालुक्यातील ४९ वर्षीय पुरुष, पुसद शहरातील ६४ वर्षीय पुरुष, नेर शहरातील ५२ वर्षीय पुरुष आणी वणी शहरातील ४० वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात गत २४ तासात नव्याने पॉझिटीव्ह आलेल्या १२४ जणांमध्ये ७६ पुरुष व ४८ महिला आहेत. यात दिग्रस शहरातील ४५ पुरुष व ३१ महिला, उमरखेड शहरातील चार पुरूष, आर्णी शहरातील एक पुरूष व तीन महिला, आर्णि तालुक्यातील दोन पुरुष, दारव्हा शहरातील दोन पुरूष व तीन महिला, दारव्हा तालुक्यातील तीन पुरुष, पांढरकवडा शहरातील पाच, पांढरकवडा तालुक्यातील एक पुरूष, पुसद शहरातील सहा पुरुष व पाच महिला, पुसद तालुक्यातील एक पुरुष, यवतमाळ शहरातील पाच पुरूष व पाच महिला, यवतमाळ तालुक्यातील एक महिला व जिल्ह्यातील एक पुरूष पॉझेटिव्ह आले आहेत.


सद्यस्थितीत जिल्ह्यात ६९५ ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये तर २४३ जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ३७२७ झाली आहे. यापैकी २६८९ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात ९९ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात १९६ जण भरती आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad