Breaking

Post Top Ad

शनिवार, १२ सप्टेंबर, २०२०

२६३ जणांची कोरोनावर मात: १९९ जण पाॅझिटिव्ह


२६३ जणांची कोरोनावर मात: १९९ जण पाॅझिटिव्ह

यवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्ड तसेच विविध कोव्हीड केअर सेंटर व कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेले २६३ बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आज दिवसभरात  जिल्ह्यात नव्याने १९९ पॉझिटीव्ह आले असून सात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

मृत झालेल्यांमध्ये सहा पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. यात पुसद शहरातील ६२ वर्षीय पुरुष, वणी तालुक्यातील ७१ वर्षीय पुरुष, आर्णि तालुक्यातील ६५ वर्षीय पुरुष, पुसद तालुक्यातील ६५ वर्षीय पुरुष, दारव्हा तालुक्यातील ६५ व ७५ वर्षीय पुरुष आणि यवतमाळ तालुक्यातील २५ वर्षीय महिलेचा मृत्यु झाला. तसेच नव्याने पॉझिटीव्ह आलेल्या १९९ जणांमध्ये पुरुष ११४ तर महिला ८५ आहेत. 

या मध्ये महागाव शहरातील आठ पुरुष व तीन महिला, महागाव तालुक्यातील एक पुरुष, उमरखेड शहरातील सात पुरुष व पाच महिला, यवतमाळ शहरातील २५ पुरुष व २१ महिला, यवतमाळ तालुक्यातील एक पुरुष, वणी शहरातील १४ पुरुष १८ महिला, पांढरकवडा शहरातील १७ पुरुष व १० महिला, पांढरकवडा तालुक्यातील आठ पुरुष व पाच महिला, नेर शहरातील चार पुरुष व चार महिला, दारव्हा शहरातील तीन पुरुष, दारव्हा तालुक्यातील तीन पुरुष व दोन महिला, आर्णी  शहरातील तीन पुरुष व दोन महिला, आर्णी तालुक्यातील एक पुरुष एक महिला, पुसद शहरातील १० पुरुष व आठ महिला, पुसद तालुक्यातील दोन पुरुष, झरी शहरातील दोन पुरुष व तीन महिला, कळंब शहरातील दोन पुरुष, कळंब तालुक्यातील एक पुरुष व एक महिला, दिग्रस शहरातील एक पुरुष व दोन महिला व  जिल्ह्यातील इतर ठिकाणचा एक पुरुषाचा समावेश आहे.


वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार सद्यस्थितीत जिल्ह्यात ११९४ ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये २७४ जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या ५४४९ झाली आहे. यापैकी ३८३५ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात १४५ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात २८७ जण भरती आहे.

 263-people-beat-Corona-199-positive

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad