यवतमाळ- आर्णी येथील २८ वर्षीय तरूणांचा विघुत शाॅक लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी दरम्यान घडली. मयुर श्याम पिल्लेवार वय २८ वर्षे असे मृतकांचे नाव आहे.
येथील गणपती मंदिर परिसरात राहणाऱ्या मयुर ला आज दि.२५ सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता दरम्यान नळाला मोटार लावताना शाॅक लागला.तद्नंतर त्याला येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले मात्र त्याला डाॅक्टरांनी मृत्यू घोषीत केले.
मृतक मयुर हा शांत आणि संयमी होता. काही वर्षा आधी मृतक मयुर च्या वडिलांचे निधन झाले होते.मयुर हा घरात सर्वात मोठा होता.त्याला एक लहान भाऊ सुध्दा आहे. शुक्रवारी सकाळी दरम्यान नळाला मोटार लावताना विघुत शाॅकचा त्याला जबरदस्त धक्का बसला त्यामुळे त्याचा यात मृत्यू झाला.
दुखद घटना भावपूर्वक श्रद्धांजली💐😔
उत्तर द्याहटवा