Post Top Ad
शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२०
यवतमाळात अभिनेत्री कंगना राणावतच्या विरोधात शिवसैनिक उतरले रस्त्यावर
मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर सोबत केल्याने संताप
यवतमाळ- हिंदी चित्रपट अभिनेत्री कंगना राणावतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर सोबत केल्याने महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे.दरम्यान आज यवतमाळात शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरुन कंगना रानावत च्या विरोधात प्रचंड नारेबाजी केली. मुंबई पोलिस तसेच महाराष्ट्राला बदनाम करण्यामागे भाजपाचा हात असल्याचा आरोप सुध्दा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
हिंदी चित्रपट अभिनेता सुशांत सिंह राजपुत याच्या आत्महत्या प्रकरणी सिबीआय चा तपास सुरु आहे. दुसरीकडे मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला होता. सदर प्रकरणात योग्य तपास न केल्याचा ठपका ठेवत कंगना रानावत ही सातत्याने उध्दव ठाकरे सरकार विरोधात बेताल वक्तव्य करीत आहे. आता तर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या विरोधात सुध्दा 'कंगना'ने चुकीचे वक्तव्य करणे सुरु केले आहे. दरम्यान मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर सोबत केल्याने शिवसैनिकांचा संताप अनावर झाल्याने यवतमाळच्या दत्त चौकात शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरुन प्रचंड नारेबाजी केली. शिवसेना महिला पदाधिका-यांनी कंगना रानावत चे पोस्टर
पायदळी तुडवत तसेच चपलेने बदडत तिचा निषेध केला.
भाजपाने वकीली बंद करावी: पराग पिंगळे,शिवसेना जिल्हाप्रमुख, यवतमाळ
कंगना रानावतने महाराष्ट्राची तुलना पाकव्याप्त काश्मीर सोबत केली. दुसरीकडे भाजपाचे नेते मात्र तिची वकीली करीत आहे. यावरुन कंगना ही भाजपची प्रवक्ती असल्याचे दिसून येते. कंगना राणावतने आपले बेताल वक्तव्य बंद करावे. महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न आम्ही खपवून घेणार नाही. वादग्रस्त विधान केल्याने कंगनाने माफी मागावी अन्यथा तिचा एकही चित्रपट आम्ही महाराष्ट्रात प्रदर्शीत होऊ देणार नाही.
राज्यात तसेच देशात अनेक महत्वाचे प्रश्न असतांना सुशांत सिंह राजपुत च्या आत्महत्येचे
भाजपा राजकारण करीत असल्याची टिका शिवसेना जिल्हाप्रमुख राजेन्द्र गायकवाड यांनी केली. कंगनाला मुंबईत असुरक्षित वाटत असेल तर तिने पाकिस्तानात जाण्याचा सल्ला सुध्दा त्यांनी दिला. शिवसेनेचे यवतमाळ विधानसभा सह संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांनी सुध्दा कंगना रानावत च्या मुंबई विरोधी तसेच पोलिसांच्या विरोधात केल्या जाणा-या वक्तव्याच्या विरोधात निषेध व्यक्त केला. याप्रसंगी शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी केल्याने परीसर दणाणून गेला. या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, जिल्हाप्रमुख राजेन्द्र गायकवाड, जिल्हा परीषदेतील शिवसेनेचे गटनेते श्रीधर मोहोड, यवतमाळ विधानसभेचे सह संपर्क प्रमुख संतोष ढवळे, प्रवीण पांडे निवासी उपजिल्हा प्रमुख, गजानन डोमाळे उपजिल्हा प्रमुख, संजय रंगे तालुका प्रमुख, प्रवीण निमोदिया,जिल्हा संघटक व्यापारी आघाडी, पिंटु बांगर, शहर प्रमुख यवतमाळ, अशोक पुरी,संजय उपगलवार,सुधिर मुनगीनवार, संजय कांबळे, संजय कोल्हे, अनिल यादव, निलेश बेलोकार, सतिष सकट, पंकज देशमुख, अतुल कुमटकर, शैलेद्र तांबे, राजु कोहरे, चेतन शिरसाट, चेतन जगताप, शंकर देऊळकर, श्याम थोरात, दिपक सुकळकर, विनोद पवार, विनोद राऊत, संजय राठोड, सुरेश ढेकळे, हेमंत उगले, अभय व्यास,हृषीकेश इलमे, अर्पित घुगरे, भुषण काटकर, आकाश जाधवर, डॉ. प्रसन्न रंगारी, शिवसेना महिला आघाडीच्या निर्मला विनकरे, कल्पना दरवई, ज्योति चिखलकर, संगीता पुरी, गार्गी गिरटकर, रश्मी तोंदवाल, विद्या सोमदे, संगिता बागडे,अर्चना बागडे, अर्चना भगत, अश्विनी बागडेश्वर उपस्थित होत्या.
Tags
देश विदेश#
Share This
About TeamM24
देश विदेश
लेबल:
देश विदेश
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Post Top Ad
Author Details
मराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response