Breaking

Post Top Ad

सोमवार, ५ ऑक्टोबर, २०२०

'जिल्ह्यात नव्याने १३ जण पॉझिटीव्ह-दोघांचा मृत्यू'

'जिल्ह्यात नव्याने १३ जण पॉझिटीव्ह-दोघांचा मृत्यू'

यवतमाळ : जिल्ह्यात सोमवारी चोवीस  तासात १३ जण नव्याने पॉझिटीव्ह आले असून दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ तालुक्यातील ४६ वर्षीय आणि दिग्रस तालुक्यातील ६५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत ७६२४१  नमुने पाठविले असून यापैकी ७५३९३ प्राप्त तर ८४८ अप्राप्त आहेत. तसेच ६६६३२ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

सोमवारी जिल्ह्यात नव्याने पॉझिटीव्ह आलेल्या १३ जणांमध्ये पुरुष १० व तीन महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील चार पुरुष व एक महिला, आर्णी शहरातील एक पुरुष व एक महिला, नेर तालुक्यातील एक पुरुष, पांढरकवडा शहरातील तीन पुरुष, राळेगाव शहरातील एक पुरुष व एका महिलेचा समावेश आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून माहिती प्राप्त न झाल्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत २०४ 'ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह' भरती असून होम आयसोलेशनमध्ये भरती असणा-यांची संख्या निरंक असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाने म्हटले आहे.  सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ८७६१ झाली आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत २७४ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात २३३ जण भरती आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad