यवतमाळ : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सीबीएस प्रणाली अंतर्गत ग्राहकांकरीता आयएमपीएस सेवा लवकर सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे बँकेच्या ग्राहकांना अल्प दरात २ लाखापर्यंत रक्कम पाठविण्याची सुविधा होईल, अशी माहिती बँकेचे प्राधिकृत अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बँकेच्या सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद देशपांडे, नाबार्डचे उपमहाव्यवस्थापक पेंदाम, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेचे गुजर, महाराष्ट्र सहकारी बँकेचे प्रतिनिधी राठोड आदी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरवातीला मागील सभेच्या कार्यवाहीचा आढावा तसेच सप्टेंबर महिन्याच्या आर्थीक बाबीचा आढावा घेण्यात आला. बँकेच्या ॲसेट्स लियाबिलीटीचा आढावा घेण्यात येऊन १ ते ३ वर्ष या कालावधीच्या ठेवीवर अर्धा टक्के व्याजदरात कपात करण्यात आली असून आता व्याजदर ६.७५ टक्के राहणार आहे.
बँकेच्या सुरक्षीततेच्या दृष्टीने सर्व शाखांवर अग्निशामक यंत्र ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. या सभेत ३१ मार्च ते ३० जून २०२० अखेरचा कृती कार्यक्रम आढावा सुध्दा घेण्यात आला. या अनुषंगाने सर्व विभाग प्रमुखांना लक्षांक पुर्ततेकरीता निर्देश देण्यात आले. बँकेची वसूली प्रभावीपणे होण्याच्या दृष्टीने वसूली अधिकाऱ्यांचा अधिकार नुतनीकरण प्रस्ताव निबंधक कार्यालयास पाठविण्याच्या सुचना वसूली प्रमुखांना देण्यात आला.
बँकेच्या कर्मचारी संघटनांनी दिवाळी निमित्त १२ टक्के सानुग्रह अनुदान व ओव्हर टाईमची मागणी केली असता बँकेच्या आर्थीक परिस्थितीचा विचार करून ८.३३ टक्के सानुग्रह अनुदानास मान्यता देण्यात आली. सभेचे विषय आटोपल्यानंतर नाबार्ड स्वच्छता अभियानाचे उद्घाटन देखील प्राधिकृत अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिंह यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बँकेच्या विभागाचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. सभेतील विषयाच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करण्याबाबत सुचना सभेत प्राधिकृत अधिकारी तथा जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response