नेहमीच बेधडक आणि वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावतच्या अडचणी कोर्टाने दिलेल्या 'आदेशा'वरून वाढल्या आहेत. मुंबईतील वांद्रे न्यायालयाने कंगनाविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. कंगनाची बहिण रंगोलीविरोधातही एफआयआर दाखल करण्यास सांगण्यात येत आहे.
कंगनानं बॉलिवूडमधील हिंदू आणि मुस्लिम कलाकारांमध्ये तणाव निर्माण केला आहे. ती सातत्याने अक्षेपार्ह ट्विट करतेय. तिची ही ट्विट धार्मिक तेढ निर्माण करणारे आहेतच पण यामुळं फिल्म इंटस्ट्रीमधील काही लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत, असंही या याचिकेत म्हटलं आहे. याचिकाकर्त्यांनी कंगनाचे ट्विट्स आणि व्हिडिओ कोर्टात पुरावे म्हणून सादर केले आहेत. त्यानंतर कोर्टानं कलम १५६ (३) अंतर्गंत एफआयआर दाखल करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत.या प्रकरणी वांद्रे पोलिस स्थानकात कंगनाविरुद्धात तक्रार दाखल करण्यास नकार दिला होता. या नंतर याचिकादारांनी कंगनाविरोधात वांद्रे कोर्टात धाव घेतली होती. कोर्टानंही या प्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहे अशी माहिती आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response