संघर्ष सेनेची मागणी
अवमानजनक वागणूक दिल्या प्रकरणी १३५ वैधकिय अधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहे.त्या अनुषंगाने राजीनामा दिलेल्या सर्व डाॅक्टरांचे राजीनामा मंजूर करून त्यांच्या जागी पदवी संपादन केलेल्या युवकांना संधी देण्याची मागणी संघर्ष सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी एम.डी.सिंह मार्फत राज्याचे मुख्यमंत्री,आरोग्य मंत्री आणि जिल्हाचे पालकमंत्री यांच्या कडे करण्यात आली आहे.
सध्या देशा सह जिल्ह्यात कोरोना महामारीचे संकट नागरिकांच्या छाताडावर थयथय नाचत आहे.अशा संकटात डाॅक्टरांनी केवळ अवमानजनक वागणूक दिल्याचा कारणावरून सामुहिक राजीनामे देऊन काम बंद आंदोलन सुरू केले आहे.हि बाब समर्थनीय नाही,अशा प्रस्थितीत 'ज्या' १३५ डाॅक्टरांनी संकटाच्या दरम्यान नागरिकांचे जीवापेक्षा स्वतःचा स्वाभिमान महत्वाचा वाटणाऱ्या डाॅक्टरांचे त्वरीत राजीनामा मंजूर करून त्यांना तात्काळ कार्यमुक्त करून घरचा रस्ता दाखवावा आणि त्यांच्या जागी पदवी संपादन केलेल्या युवकांना संधी देण्याची मागणी संघर्ष सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत राज्याचे मुख्यमंत्री,आरोग्य मंत्री,पालकमंत्री आणि विभागीय आयुक्त यांच्या कडे करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागातील डाॅक्टर हे सामान्य नागरिकांना कशा पद्धतीने आरोग्य सुविधा देतात हे ग्रामीण भागातील सर्वच नागरिकांना माहिती आहे.त्यामुळे राजीनामा दिलेल्या डाॅक्टरांचे तात्काळ कार्यमुक्त करण्याची मागणी निवेदनातून संघर्ष सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.यावेळी प्रविण चव्हाण,बळीराम राठोड,बंडू चव्हाण,वसंता जाधव,अशोक चव्हाण,अजय जाधव,गणेश चव्हाण,दिनेश राठोड,स्वप्निल राठोड,किशन चव्हाण योगेश जाधव सह.आदी कार्यकर्ते उपस्थितीत होते.दरम्यान डाॅक्टरांना कार्यमुक्त न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response