यवतमाळ :तालुक्यातील भांब राजा येथे रविवारी चार वाजताचे दरम्यान विज पडुन बैलजोडी ठार झाली. प्रविण बाबाराव ऊईके यांच्या मालकीची ती बैलजोडी होती.शेत शेजारी संतोष डाळ यांचे शेतात बैल चरत असताना ही दुदैर्वी घटना घडली. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.
हाता तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावुन नेला आहे. शासनाने तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी पिडीत शेतकरी प्रविण बाबाराव ऊईके यांनी केली आहे.आस्मानी आणि सुलतानी संकटाच्या चक्रव्युहात शेतकरी अडकला आसताना शेतात वीज पडल्याने बैल जोडी चा जागीच मृत्यू झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response