'हि माहिती तुम्हाच्या वाचनात येणार नाही,त्यामुळे नेमकं त्या दिवशी काय घडलं,कोणाची चुक झाली याचा सविस्तर आढावा'
जिल्हाधिकारी विरूद्ध डाॅक्टर अशा सामना गेल्या चार दिवसा पासून सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी डाॅक्टरांच्या सर्व मागण्या मान्य केल्या नंतरही डाॅक्टर संघटनेने काम बंद आंदोलन मागे घेतलेले नाही, आयुक्त आणि पालकमंत्री यांनी सुद्धा डाॅक्टरांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले तरीही ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाही.जिल्हाधिकारी एम.डी.सिंह हे यंग आणि कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत.कोरोना च्या संकटात त्यांनी यंत्रणेतील कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या मर्जी प्रमाणे वागू दिले नाही हाच जिल्हाधिकारी यांचा सर्वात मोठा गुन्हा आहे.त्यामुळे आंदोलन करणाऱ्या डाॅक्टर संघटनेच्या मागण्या जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केले असताना केवळ जिल्हाधिकारी यांची बदली करा अशी अडमुठी भूमिका घेणे कितपत योग्य आहे.
'ज्या' डाॅक्टर संघटनेनी आंदोलन सुरू केले आहे.त्या डाॅक्टरांनी खरच रूग्णांना त्यांच्या कार्यकाळात चांगली सुविधा दिली आहे का? उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना डाॅक्टर कधी घरातील सदस्य प्रमाण वागणूक दिली असेल का? ग्रामीण भागातील आरोग्य च्या दृष्टीने डाॅक्टरांनी कोणते सकारात्मक उपाययोजना केल्या याचा विचार आंदोलन करणाऱ्या डाॅक्टरांनी नक्की करावा.
जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेतील अधिकाऱ्यावर नियंत्रण ठेवले नसते तर कोरोनाचा जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात उद्रेक झाला असता मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागातील वैधकिय अधिकाऱ्यांना त्यांच्या मर्जी प्रमाणे वागू न दिल्याने आणि एका काॅग्रेसच्या नेत्याला वेळेवर भेट न दिल्याने जनतेला वेठीस धरण्याच्या दृष्टीने नियोजन करून काम बंद आंदोलन केल्या जात असल्याची चर्चा सामान्य नागरिकांसह सोशल मिडीया वर सुरू आहे.विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या समर्थनात हजारो संघटना सरसावल्या असून लवकरच डाॅक्टर संघटनेच्या विरोधात आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या समर्थनात जन आंदोलन जिल्हाभर करण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
'नेमकं त्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांच्या कॅबिन मध्ये काय घडलं'
सोमवार दि.२८ सप्टेंबर ला डाॅक्टर संघटनेचे सहा पदाधिकारी जिल्हाधिकारी सिंह यांना विविध मागण्यांचे निवेदन घेऊन भेट घेतील.जवळपास ही भेट साडे पाच मिनिटं सुरू होती. जिल्हाधिकारी यांच्या कॅबिन मध्ये प्रवेश करताना डाॅक्टर संघटनेचे पदाधिकारी खडकन जाऊन जिल्हाधिकारी पुढे बसतात.खर तर आपल्या वरिष्ठांना भेटण्यासाठी जेव्हा कोणी जातो त्या दरम्यान लवचिक पणा अर्थात वरिष्ठांना वाकून,नमस्कार करून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कॅबिन मध्ये प्रवेश करतात.मात्र या सहा डाॅक्टरांनी तसे केले नाही.थेट आत मध्ये प्रवेश करून खुर्ची वर बसतात आणि पाच मिनिटं सकारात्मक चर्चा जिल्हाधिकारी आणि डाॅक्टरांमध्ये सुरू होते.दरम्यान पटकन उठून चला चला अशी आरडाओरडा करून जिल्हाधिकारी यांच्या समोरून निघुन जाता.त्या दरम्यान जिल्हाधिकारी त्यांना म्हणतात "क्या हू वा,क्युँ जा रहे हो".मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात साडे पाच मिनिटात जिल्हाधिकारी यांनी त्या सहा डाॅक्टरांना कुठे ही अवमानजनक अथवा उद्धट वागणूक दिली नसताना जिल्हातील नागरिकांना वेठीस धरण्याचे कारण काय? अधिकाऱ्यांना जात,धर्म नसते ते देशासाठी कर्तव्य बजावतात मात्र काही लोकांना कर्तव्यदक्ष अधिकारी नको आहे.म्हणुन आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून तांडव सुरू केले आहे.त्यामुळे आता सामान्य नागरिकांनी एकजूट दाखवून रस्त्यावर उतरणार असल्याची चर्चा सुरू आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response