Breaking

Post Top Ad

बुधवार, २८ ऑक्टोबर, २०२०

प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत जनजागृती रथाला हिरवी झेंडी

प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत जनजागृती रथाला हिरवी झेंडी
यवतमाळ : जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना, तीन वर्ष म्हणजेच सन २०२०-२१, २०२१-२२ व २०२२-२३ च्या खरीप व रब्बी हंगामातील अधिसूचीत पिकांकरीता लागू झाली आहे. या योजनेची रब्बी हंगाम २०२०-२१ ची अंतिम दिनांक १५ डिसेंबर २०२० आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत विम्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन करणे तसेच शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्याच्या अनुषंगाने जनजागृती करणा-या वाहनांना जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांच्या उपस्थित हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, इफ्को टोकिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमीटेडचे जिल्हा व्यवस्थापक अर्जुन राठोड, तंत्र अधिकारी शिवा जावध आदी उपस्थित होते.

फिरत्या वाहनाद्वारे जिल्ह्यातील १६ तालुक्यात इफ्को टोकिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमीटेड, पुणे यांचेद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना सन २०२०-२१ रब्बी हंगामाकरीता लागू करणेबाबत शासन निर्णयाद्वारे मान्यता दिली आहे. सदर योजनेची अंतिम दि. १५ डिसेंबर २०२० गहू / हरभरा पिकाकरीता असून ३१ मार्च २०२१ हा भुईमुग पिकासाठी अंतीम दिनांक आहे.

शासनाने प्रधानमंत्री पिक विमा योजना २०२०-२१ करीता विमा कंपनी इफ्को टोकिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमीटेड, ०६ वा मजला, सुयोग प्लॅटीनम, मंगलदास रोड, पुणे दुरध्वनी क्रमांक 020-67278900 टोल फ्री क्र. 18001035499 agrimh@iffcotokio.co.in  या कंपनीची निवड केली आहे. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक स्वरुपाची आहे. तरी सदर योजनेचा जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधु, भगीनींनी लाभ घ्यावा, असे आवाहन नवनाथ कोळपकर यांनी केले आहे.गहु व हरभरा पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर प्रत्येकी ३५ हजार रुपये असून शेतकऱ्यांना भरावयाचा पीक विमा हप्ता प्रति हेक्टरी प्रत्येकी ५२५ रूपये आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad