या मोहीमेला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कालिंदा पवार व आरोग्य सभापती श्रीधर मोहेाड यांचे सहकार्य लाभणार आहे. जिल्हास्तरीय अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांना जिल्हातील ६६ प्राथमिक आरोग्य केंद्रापैकी २५ प्रा.आ.केद्र दत्तक देउन त्याचा नियमित पाठपुरावा देखरेख ठेवणार आहे. या मिशन कायाकल्पकरीता त्यांनी जिल्हास्तरावर स्वत:च्या अध्यक्षतेखाली जिल्हा आरोग्य अधिकारी व इतर अधिकाऱ्यांसह जिल्हा कायाकल्प टास्क फोर्स तयार केला आहे. तसेच तालुकास्तरावर गटविकास अधिकारी यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी व एक वैद्यकीय अधिका-यासह टास्क फोर्स व प्रत्येक प्राथमिक आरोग्य केद्रांवर वैद्यकिय अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली एक टास्क फोर्स राहणार आहे.
मोहिमेत आरोग्य संस्थेतील साहित्यांची व्यवस्थित मांडणी, स्व्च्छता, निटनेटकेपणा ,औषधीसाठा, उपकरणे, डीप बरीयल वेस्ट मॅनेजमेंट व गुणवत्तापुर्ण सेवा इत्यादी गोष्टीवर विशेष भर दिल्या जाईल. या मोहिमेकरीता मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सर्व वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांना आवाहन केले आहे की, या मोहिमेत उस्फुर्त सहभाग घेऊन सदर मोहीम प्रभावीपणे राबवावी व जिल्हयात नव्हे तर राज्यात आदर्शवत प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करावी. प्रसंगी अतिरीक्त निधीची आवश्यक्ता पडल्यास वेगवेगळया योजनेचा अंतर्भाव केल्या जाईल.
प्रत्येक महिन्याला विहीत नमुन्यात बाबनिहाय प्रगतीचे अहवाल प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र भरून तालुकास्तरावर त्याचे मुल्यांकन करणार व मिशन मोड मधील २५ प्रा.आ.केद्रांचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी कक्षाला दिला जाईल. दत्तक दिलेल्या २५ प्रा.आ.केंद्राना दत्तक अधिकारी नियमित भेटी देणार तसेच महिन्यातून किमान एक वेळा तालुका आरोग्य अधिकारी प्रत्येक प्रा.आ.केद्रांना भेटी देऊन मोहिमेचा प्रत्यक्ष आढावा घेणार आहे. दर तीन महिन्यातून मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतः आढावा घेणार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response