यवतमाळ: जिल्ह्यात रविवारी २२ जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८७४८ झाली आहे.नव्याने पॉझिटीव्ह आलेल्या २२ जणांमध्ये पुरुष १६ व सहा महिला आहेत.
सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या ८७४८ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २७२ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात २४४ जण भरती आहे.
यात यवतमाळ शहरातील आठ पुरुष व पाच महिला, उमरखेड शहरातील तीन पुरुष, पांढरकवडा शहरातील तीन पुरुष, नेर तालुक्यातील एक पुरुष व एक महिला, महागाव तालुक्यातील एक पुरुषाचा समावेश आहे.जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून माहिती प्राप्त न झाल्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत २१७ 'ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह' भरती असून होम आयसोलेशनमध्ये भरती असणा-यांची संख्या निरंक असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाने म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response