Breaking

Post Top Ad

मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२०

मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्री

मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्री
मुंबई- गेल्या अनेक दिवसा पासून मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्री सुरू असल्याचा प्रकार आज पोलीसांनी उघडकीस आणला. काशिमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय हजारे यांना मीरा रोड पूर्व येथील आकृती हब टाऊन कॉम्प्लेक्समध्ये रिलॅक्स स्पा सेंटरमध्ये आयुर्वेदिक आणि थाई थेरपी मसाजच्या नावावर देह व्यापार चालविला जातो अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार विशेष पथकाने शुक्रवारी स्पा सेंटरवर छापा टाकुन कारवाई करण्यात आली.

भाईंदर-मीरा रोड येथील मसाज सेंटरमध्ये अवैध पद्धतीने राबवले जाणारे देह व्यापार करणारे जाळे काशिमीरा पोलिसांनी उघडकीस आणले आहे. या प्रकरणात दोन महिलांची सुटका करण्यात आली असून मालक आणि व्यवस्थापकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

मसाज सेंटरचे मालक आनंद कुमार गिरीशचंद्र राय (३५) आणि व्यवस्थापक याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या दोन्ही आरोपींनी पीडित मुलींचा वापर आपल्या पुरुष ग्राहकांना दाखवण्यासाठी केल्या जात होता. मीरा, भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय सुरू झाल्यापासून गैरधंद्यांना आळा बसण्यास सुरुवात झाली  आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad