Breaking

Post Top Ad

मंगळवार, ६ ऑक्टोबर, २०२०

खळबळ:एकाच दिवशी नऊ जणांचा मृत्यू

 

खळबळ:एकाच दिवशी नऊ जणांचा मृत्यू

यवतमाळ जिल्ह्यात मंगळवारी चोवीस तासात ५६ जण नव्याने पॉझिटीव्ह आले असून नऊ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील पाच जणांचा समावेश असून तालुक्यातील एक जणांचा यात मृत्यू झाला आहे. दरम्यान  कळंब तालुक्यातील ५८ व ६४ वर्षीय पुरुष आणि वणी शहरातील ९२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत ७५७९२  नमुने पाठविले असून यापैकी ७५९०३ प्राप्त तर ८८९ अप्राप्त आहेत. तसेच ६७०८५ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

मंगळवारी  नव्याने पॉझिटीव्ह आलेल्या ५६ जणांमध्ये पुरुष ३३ आणि २३ महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील २४ पुरुष व महिला १३ आणि यवतमाळ तालुक्यातील एक पुरुष व एक महिला, आर्णी शहरातील एक महिला, दारव्हा शहरातील एक पुरुष, घाटंजी शहरातील तीन पुरुष व तीन महिला, कळंब शहरातील एक पुरुष, नेर तालुक्यातील दोन पुरुष, पुसद तालुक्यातील एक पुरुष व एक महिला, वणी शहरातील दोन महिला, वणी तालुक्यातील दोन महिला पॉझेटिव्ह आहेत.


जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून माहिती प्राप्त न झाल्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत २०४ 'ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह' भरती असून होम आयसोलेशनमध्ये भरती असणा-यांची संख्या निरंक असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाने म्हटले आहे.  सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ८८१८ झाली आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत २८३ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात २३२ जण भरती आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad