Breaking

Post Top Ad

सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२०

ऑनलाईन शिक्षणासाठी विद्यार्थी 'झाडा'वर


ऑनलाइन शिक्षण उठले जिवावर 

ऑनलाईन शिक्षणासाठी विद्यार्थी 'झाडा'वर
मारेगाव(यवतमाळ): लॉकडाऊनच्या काळात सरकारने विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणाची सोय केली. आता अनलॉकमध्ये शिक्षक शाळेवर हजर होत आहे. मात्र अद्यापपर्यंत शाळा सुरू झाली नाही, त्यामुळे गुरूजी शाळेत तर विद्यार्थी 'झाडा'वर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

अनेक खाजगी शाळा, कॉन्व्हेंट, तसेच पैसे कमावण्याच्या मोहापायी काही शाळांनी ऑनलाईन शिक्षणाचा फंडा उभा केला. यामुळे शिक्षक शाळेत तर विद्यार्थी घरावर अशी परिस्थिती ग्रामीण भागात निर्माण आल्याचे चित्र ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातुन समोर येत आहे.

 कोरोनामुळे सगळे आर्थिक व्यवहार ठप्प पडलेले आहेत. अनेक क्षेत्रातील नोक-यांवर गंडांतर आले. अनेक उद्योगधंदे बंद पडलेले आहेत तर काही उद्योग सलाईनवर आहेत. अशातच शाळांनी त्यातही खाजगी व इंग्रजी माध्यमांच्या शाळा यांनी फी वसुलीसाठी ऑनलाईन शिक्षणाचा फंडा सुरू केलेला आहे. ग्रामीण भागात जिथे साध्या मोबाईलवर बोलायला नेटवर्क मिळत नाही. कोरोनाच्या भितीमुळे शाळा बंद आहेत. परंतु खाजगी शाळांकडुन वसुली मात्र बंद पडायला नको या वेगळ्या उद्देशाने खाजगी तसेच इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी ऑनलाईन शिक्षण सुरूच आहे. यामुळे शिक्षक शाळेत तर विद्यार्थी घरावर किंवा झाडावर असे चित्र अनेकदा पहायला मिळत आहे. आता यामध्ये शिक्षण किती आणि कसे होते हाही एक संशोधनाचा विषय आहे. काही ठिकाणी परिक्षेच्या वेळेस विद्यार्थी हा मोबाईल समोर तर पालक मोबाईलच्या मागे पुस्तक घेऊन असेही चित्र दिसुन येत आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थी मोबाईलवर जास्त वेळ घालवत असल्याने अभ्यासाव्यतीरिक्त गेम खेळण्याकडे विद्यार्थ्यांचा कल दिसुन येतो त्यामुळे शहरासोबतच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad