Breaking

Post Top Ad

मंगळवार, ६ ऑक्टोबर, २०२०

'अखेर ठाकरे 'सरकार'ला चित्रपटगृहचा सापडला मुहूर्त'

'अखेर ठाकरे 'सरकार'ला चित्रपटगृहचा सापडला मुहूर्त'

महाराष्ट्रातात दोन दिवसा पुर्वी सरकारने रेस्टॉरंट, बार आदी गोष्टींना काही नियमाचे कडक पालन करण्याच्या सुचना देऊन सुरू केले.मात्र राज्यातील चित्रपटगृह अद्यापही सुरू न झाल्याने चित्रपट गृहावर आधारीत लोकांवर उपासमारिची वेळ आली आहे. त्याच अनुषंगाने चित्रपटगृहे सुरु करण्यासाठी 'ठाकरे सरकार' सकारात्मक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

केंद्रीय गृहमंत्रालायने अनलॉक ५ अंतर्गत गाइडलाइन्स लागू केल्या आहेत. त्यामध्ये दि. १५ ऑक्टोबरपासून सिनेमा हॉल्स, चित्रपटगृहे उघडण्यास संमती देण्यात आली आहे. यासंदर्भात ठाकरे सरकार गांभीर्याने विचार करत आहे. सरकार यासंबंधीच्या निर्णयासाठी सकारात्मक आहे असं सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी म्हटलं आहे. “सिनेमागृहं सुरु करण्याबाबत केंद्र सरकारने आज निर्णय घेतला असून नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्र सरकार गांभीर्याने विचार करतं आहे.


नवरात्र, दसरा, दिवाळी हा चित्रपट, नाटकांसाठी हंगाम असतो. त्यामुळे चित्रपटगृहं सुरु करण्याची संमती द्यावी अशी विनंती करण्यात आली आहे. यासंदर्भात सरकार सकारात्मक असून लवकच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार होणार आहे.” “महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे. त्यामुळी शिथीलता देण्याआधी विचार केला जाईल मगच निर्णय घेतला जाईल. गेल्या सहा महिन्यांपासून सिनेसृष्टी, नाट्यसृष्टी अडचणीत आहे. त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळलं आहे. त्या अनुषंगाने त्यांना त्यातून बाहेर काढणं आणि या समस्येतून मार्ग काढून लवकरच यासंदर्भातलं चित्र स्पष्ट होईल” असंही अमित देशमुख यांनी म्हटलं आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad