'सद रक्षणाय,खल निग्रहणाय', हे ब्रीद कपाळावर,छातीवर आणि दंडावर मिरवताना आपण खरेच या शब्दांना जागतो का? असा प्रश्न शनिवारी घडलेल्या शेतकरी मारहाण घटनेनंतर चर्चेला जात आहे.
घाटंजी शहरात भाजी मंडीत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांची गाडी थांबवून वाहतूक पोलिसांनी एका तरूण शेतकऱ्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी साडे सहा वाजता दरम्यान घडली होती.तद्नंतर किसानसभेचे अध्यक्ष देवानंद पवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ.दिलीप भुजबळ पाटील यांच्या कडे गणेश आगे नामक वाहतूक पोलीस शिपाईला बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी लावून धरली असताना चोवीस तास उलटल्या नंतरही काहीच कारवाई न झाल्याने पोलीस विभागा बदल सर्वसामान्य लोकांमधून तीव्र रोष व्यक्त होत आहे.
सकाळी वाहतूक पोलीस करत काय होता?
एरवी नागरिकांना सेवा देण्या ऐवजी पठाणी वसूली करण्यात वाहतूक पोलीस शिपाई व्यस्त असतात. मात्र घाटंजी पोलीस स्टेशन मध्ये कर्तव्य बजावत असलेले गणेश आगे हे एवढ्या सकाळी कर्तव्य बजावत असले तर त्याला पोलीस विभागाने खरच पुरस्कार देऊन त्याचा सन्मान करा अशी मागणी होत असून आगे वर कारवाई न केल्यास शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार यांनी दिला आहे.
तळणी येथील तरूण शेतकरी नामे संदीप श्रीराम राठोड हे चारचाकी माल वाहतूक मधून घाटंजी येथे भाजीपाला मंडीत विक्री साठी नेत असताना सदर वाहतूक पोलीस शिपाई आगे यांनी भाजीपाल्याची गाडी अडवून तीनशे रूपयांची मागणी केली.दरम्यान चालक आणि शेतकरी संदीप यांनी वाहतूक पोलीस यांना सांगितले की, साहेब आता आमच्या कडे पैसे नाही,भाजीपाला विकल्या नंतर देतो त्या वरून वाहतूक पोलीस शिपाई यांनी शेतकरी संदीप राठोड याला भरचौकात मारहाण करित अश्लील शिविगाळ केली.त्यानंतर शेतकरी संदीप राठोड यांनी देवानंद पवार यांना घडलेली घटना सांगितली असता 'पवार' यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कडे संबधित वाहतूक पोलीस शिपाईला बडतर्फ करण्याची मागणी केली मात्र त्या कडे पोलीस प्रशासनाने स्पेशल दुर्लक्ष केल्याचे पुढे आले आहे.
दरम्यान मारहाण करण्यात आलेल्या शेतकऱ्यानी वाहतूक पोलीस शिपाई आगे विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता त्या तक्रारीचे काय झाले ते अद्यापही शेतकऱ्याला समजले नाही आहे.रविवारी शेतकरी संदीप राठोड हा घाटंजी पोलीस स्टेशन मध्ये सकाळ पासून तळ ठोकून बसून असताना त्याला तक्रारी संदर्भात बोलायला सुद्धा तयार नसल्याची माहिती खुद पिडीत शेतकरी संदीप ने दिली आहे. आधीच परतीच्या पावसामुळे शेतकरी हैराण असताना पोलिसा पैशाच्या कारणावरून मारहाण करणे हे कितपत योग्य आहे.अशा प्रश्न या निमित्ताने सोशल मिडीयावर विचारला जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response