Breaking

Post Top Ad

बुधवार, २१ ऑक्टोबर, २०२०

पुसद-खंडाळा घाटात ट्रॅव्हल अपघात

पुसद-खंडाळा घाटात ट्रॅव्हल अपघात
प्रदिप नरवाडे। पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या खंडाळा घाटात ट्रॅव्हल्स ला  भीषण अपघात झाला असून यात एक जण जागीच तर दुसरा उपचारा दरम्यान मृत्यु झाले तर २५ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

पुसद-खंडाळा घाटात ट्रॅव्हल अपघात
ट्रॅव्हल चालकाचे  वळणावरील रस्त्यावर नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला,असून एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 
पुसद-खंडाळा घाटात ट्रॅव्हल अपघात
पुणे ते यवतमाळ लिबर्टी ट्रॅव्हल क्रमांक एम.एच.२९ ए.के.८२२२  वाशिम कडून पुसद कडे येत असताना अचानक खंडाळा घाटात अपघात झाला.अपघतात ट्रॅव्हलने पलटी घेतल्याने एक जण जागीच ठार झाला तर दुसरा उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने एकुण दोघांचा अपघातात मृत्यु झाला असून  २५ प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे.
 
ट्रॅव्हल पुसद वरून यवतमाळ कडे  जाणार होती.मात्र खंडाळा घाटात भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये वीस ते पंचवीस प्रवासी जखमी असून १७ प्रवासींना पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये उपचारा करिता भर्ती करण्यात आले आहे. दरम्यान अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून मृतकांचे नाव सभजले नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad