जिल्हाधिकारी डी.एम. सिंह आणि जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी ईदच्या पार्श्वभूमीवर बोलावलेल्या शांतता समितीची सभा प्रशासकीय इमारतीच्या अत्यंत आकर्षक अशा सोयींनीयुक्त सभागृहात आयोजित होती. या सभेत नगराध्यक्ष कांचन चौधरी , उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी , जिल्हा परिषद सीईओ डॉक्टर बल्लाळ तहसीलदार झाल्टे, धनंजय सायरे, आनंद वागतकर, संजय शिरभाते, सचिन लुले हे ठाणेदार ,तुकडोजी विचार मंचचे अरुण देशमुख राष्ट्रीय एकता मंचचे शकील अहमद आणि मौलाना इब्राहिम व पत्रकार न.मा.जोशी आदींनी मार्गदर्शन केले.मौलाना इब्राहिम यांनी शेरोशायरी सुनावली.अरुण देशमुख यांनी महाराजांच्या ग्रामगीतेतील संदर्भ दिले .नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी शहराची ओळख करून दिली. न . मा. जोशी यांनी' चिटी के पद घुंगरू बांधे तो भी साहब सुनता है! हा कबीराचा दोहा सांगुन दाढी की नसिहत ही मार्मिक ज्ञकविता सादर केली.
माॅ कहती है, बेटा मत निकाल दाढी वे मार डालेंगे तुझे हिंदू समझ कर,बाप कहता है, बेटा निकाल दे दाढी वे मार देंगे तुझे मुस्लिम समझ कर,मै सोचता हुॅ, क्या दाढीही करेगी,मेरी जिंदगी और मत
क्या कोई नही बचाएगा मुझे आदमी समझ कर? अतिशय सुंदर असे संचलन उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर यांनी केले. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप पाटीलभुजबळ यांचे मार्गदर्शन झाले.त्यांचे भाषण उच्चविद्याविभूषित प्राध्यापक किंवा शिक्षण तज्ज्ञ किंवा कुलगुरूंचे भाषण असावे आणि समोर सारी विद्वान प्राध्यापक मंडळी बसली आहेत असे वाटावे असे ते दृश्य होते.पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ यांनी आपल्या भाषणात दुष्यंत कुमार पासून तर कबीर दोहे,सुफीसंतांच्या शेरोशायरी सांगत राष्ट्रप्रेम देशभक्ती त्याग प्रेम सत्य धर्म अहिंसा ही मानवी मूल्य सांगत मानवता धर्माचा स्वीकार आपण करावा,समाजातील असामाजिक तत्वांना शोधून त्यांना धडा शिकवण्याचा ही पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
पोलीस खात्यात असूनही त्यांची भाषण शैली आणि विचार एखाद्या पट्टीच्यावक्या सारखे वाटले.आपल्या भाषणात त्यांनी साहेबांचा श्रद्धा या विषयावरील एक किस्सा सांगितला आणि प्रचंड टाळ्या घेतल्या.एका शेतकऱ्याने शेतात पिकवलेली द्राक्षे पैगंबर साहेबांना ओंजळीत आणून दिली.ती खाण्याचा आग्रह केला.पैगंबर साहेबांनी एक एक करीत सारी द्राक्षे ओंजळीतली खाऊन टाकली आणि नंतर आपल्या शिष्यांना ही द्राक्षे खाण्याची विनंती केली.पहिल्याच शिष्याने एकच द्राक्ष तोंडात टाकता बरोबर ते कमालीचे आंबट असल्याने थुंकले . पैगंबर साहेबांना विचारले की इतकी आंबट द्राक्षे आपण खाल्लीच कशी ?तेव्हा पैगंबर साहेब म्हणाले, या शेतकऱ्याची माझ्यावर असलेली श्रद्धा पहा! महत्प्रयासाने त्यानेही आणलेली द्राक्षे ती कितीही अंबड असली तरी त्याला आनंद देण्यासाठी मी ही सर्व द्राक्ष खाल्ली. आपल्या कृतीने आपण जीवनात प्रत्येकाला आनंद आणि आनंदच दिला पाहिजे, कष्ट झाले तरी चालले .असा महत्त्वाचा संदेश पोलीस अधीक्षकांनी दिला तेव्हा सभागृहात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. मराठी भाषेवरील त्यांचे प्रभुत्व आणि अभ्यास पाहून सारे सभागृह अवाक झाले.
डॉ.दिलीप भुजबळ एल बी बी आणि लाॅ विषयात पी एचडी आहेत. कोरोना युद्धा म्हणून त्यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. बुलढाणा जिल्ह्यात पोलीस अधीक्षक अध्यक्असताना त्यांनी पाच मार्चला म्हणजे लॉक डाऊन च्याही आधी सैलानी बाबाच्या यात्रेला मनाई केली होती. मुस्लिम बांधवांनी जय्यत तयारी केल्यावर ऐनवेळी सोशल डिस्टंसिंग पाळा अन्यथा कोरोना चा कहर झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देत त्यांनी यात्रा रद्द करून लोकांना घरीच उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते.मुस्लिम बांधवांनी देखील प्रचंड प्रतिसाद दिला होता. ही यात्रा रद्द झाली नसती तर किती कहर झाला असता याची कल्पनाच करवत नाही हे येथे लक्षात घेण्यासारखे आहे.मुस्लिम बांधवांवर किती आणि कशा प्रकारचे आरोप केल्या गेले असते याचीही कल्पना करता येत नाही.
बुलढाणा जिल्ह्यात पोलिस अधीक्षक असताना कोरोना योद्धा म्हणून त्यांचा सन्मान झाला आहे .एक कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलिस अधिकारी अशी डॉक्टर दिलीप भुजबळ पाटील यांची प्रतिमा आहे. पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यांचे नैतिक बळ वाढवण्यासाठी सतत झटणारा व प्रयत्न करणारा अधिकारी अशी त्यांची ओळख झाली आहे. शांतता समितीची सभा केवळ उपचार न ठरता समितीच्या शिफारशी अमलात आल्या पाहिजे. या समितीत समाजाच्या विविध क्षेत्रातील सर्व अनुभवी मान्यवरचा समावेश असल्याने समितीचा नितांत आदर केला जावा अशी त्यांची भूमिका आहे. समिती सदस्यांना ओळखपत्र देण्याचेही त्यांनी मान्य केले.
(लेखक हे जेष्ठ पत्रकार असून राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response