Breaking

Post Top Ad

शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०२०

जिल्हाधिकारी-डाॅक्टर वादात जीत कोणाची झाली'?

जिल्हाधिकारी-डाॅक्टर वादात जीत कोणाची झाली'?
'अखेर जिल्हाधिकारी-डाॅक्टर वादावर पडदा'- डाॅक्टर संघटनेनी घेतले आंदोलन मागे

जिल्हाधिकारी विरुध्द जिल्हा परिषद आरोग्य विभागातील वैद्यकिय अधिकारी यांच्यात गेल्या चार दिवसा पासून वाद सुरू होता.जिल्हाधिकाऱ्यांनी डाॅक्टरांना अपमानजनक वागणूक देत असल्याचा आरोप करित डाॅक्टर संघटनांनी  जिल्हाधिकारी विरोधात एल्गार पुकारला होता.त्या अनुषंगाने गुरूवारी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी डाॅक्टरांच्या सर्व मागण्या मान्य केला.त्यानंतर "वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवा,नागरिकांच्या आरोग्याच्या हितासाठी कामा वर या" असे आवाहन जिल्हाधिकारी सिंह यांनी केले त्या नंतर जिल्हाचे पालकमंत्री संजय राठोड आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष कालिंदा पवार यांच्या मध्यस्थीने डाॅक्टरांनी शुक्रवारी आंदोलन मागे घेतले.

जिल्हाधिकारी-डाॅक्टर वादात जीत कोणाची झाली'?

'ज्या' महसुल विभागातील अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या विरोधात दंड थोपटले होते.त्या अधिकाऱ्यांची गुरूवारी तडकाफडकी बदली झाल्याने डाॅक्टर संघटनेला मोठा धक्का बसला.मात्र जिल्हाधिकारी सिंह यांनी लोकहितासाठी डाॅक्टरांना केले आवाहान 'लक्षवेधी' ठरले.पालकमंत्री संजय राठोड आणि जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदा पवार यांनी तडजोड करून आंदोलन मागे घ्यायला लावले.त्यामुळे जिल्हातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

जिल्हाधिकारी-डाॅक्टर वादात जीत कोणाची झाली'?

डाॅक्टर संघटनेनी गेल्या चार दिवसा पासून राजीनामा देऊन काम बंद आंदोलन सुरू केले होते.कोरोनाच्या संकटात डाॅक्टरांनी आंदोलन सुरू केल्याने डाॅक्टर संघटना वर नागरिकांमधून तीव्र नाराजीचा सुरू उमटत होता.विशेष म्हणजे डाॅक्टर संघटनेला सुरूवातीला महसुल विभागातील तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि मुख्याधिकारी यांनी पांठीबा जाहीर केला.मात्र दोन दिवसा पुर्वी आयुक्त पियुष सिंह यांनी दोन्ही बाजू ऐकुन घेतली.त्या दरम्यान महसुल विभागातील तहसीलदार यांना विचारणा केली असता त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर नाराज नसल्याचे स्पष्ट केले.त्याच दरम्यान डाॅक्टर संघटनेनी जिल्हाधिकारी हटावा अशी मागणी केल्यामुळे खऱ्या अर्थाने आंदोलनात फुट पडली.विशेष म्हणजे जिल्ह्यातील नागरिकांचा जिल्हाधिकाऱ्यांना वाढता पांठीबा त्यामुळे डाॅक्टर संघटने वर दबाव वाढला गेला.

'वादात कोणाची झाली जीत'?

गेल्या चार दिवसांपासून जिल्हाधिकारी विरूद्ध डाॅक्टर संघटना अशा सामना सुरू होता.डाॅक्टर ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.मात्र जिल्हाधिकारी सिंह यांनी डाॅक्टरांना नागरिकांसाठी केलेले 'कळकळी'चे आवाहन नक्कीच जिल्ह्यातील नागरिकांच्या काळजात घर करून बसणारे होते.त्यामुळे डाॅक्टरांनी जरी आंदोलन मागे घेतले असले तरी यात केवळ जिल्ह्यातील नागरिकांची जीत झाली.कारण वाद जरी जिल्हाधिकारी आणि डाॅक्टरांचा असला तरी सद्याच्या घडीला डाॅक्टरांची देशाला आणि नागरिकांच्या दृष्टीने अतिशय गरजेचे आहे.त्या अनुषंगाने 'या लढाईत ना, जिल्हाधिकारी हरले ना, डाॅक्टर हरले' 'जिंकले' ते फक्त आणि फक्त जनता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad